
कोरोना योद्धांचा सत्कार करणे हे माझे मोठे भाग्य, डॉक्टर मयुरी शिंदे !!
कोरोना योद्धांचा सत्कार करणे हे माझे मोठे भाग्य, डॉक्टर मयुरी शिंदे !!
कोरोना काळात कोरोना योद्धांनी खरोखरच उल्लेखनीय आणि कौतुकास्पद कार्य केले असून त्यांचा सत्कार करण्याची संधी मला मिळते हे मी माझे भाग्य समजते असे गौरवोद्गार सम्राट शेअर आणि केअरच्या संचालिका, समाजसेविका डॉक्टर मयुरी संतोष शिंदे यांनी भायखळा येथे आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात केले त्या पुढे म्हणाल्या कोरोना काळात लोकांचे संसार उघड्यावर पडले असून अनेक लोकांच्या नोकऱ्या देखील गेले आहेत त्यामुळे त्यांचे जीवन कसं सुसह्य होईल त्यासाठी प्रयत्न करत आहोत या दृष्टिकोनातून आम्ही या योद्धांना मदत आणि त्यांच्या कार्याची प्रशंसा करून त्यांना सन्मान चिन्ह आणि पुरस्कार प्रदान केले यापुढे देखील आम्ही लोकांच्या अडीअडचणी सोडविण्याचे काम करणार असून त्यांना वैद्यकीय क्षेत्रातही काही मदत लागल्यास त्यांनी नक्कीच माझे दवाखान्यात येऊन माझ्याकडे संपर्क साधावा असे आवाहन समाजसेविका डॉक्टर मयुरी संतोष शिंदे यांनी या समारंभात दिले या समारंभात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या अंगणवाडी सेविका परिचारिका तसेच कोरोना योद्धांचा सन्मान करून त्यांना पुरस्कार सन्मानचिन्ह आणि भेटवस्तू प्रदान करण्यात आले या समारंभात प्रमुख पाहुणे म्हणून राष्ट्रवादी कॉंग्रेसचे मुंबई उपाध्यक्ष बंड्या गांगण, निवृत्त सहाय्यक पोलिस आयुक्त राजेंद्र पवार उपस्थित होते.
माझी धर्मपत्नी डॉक्टर मयुरी शिंदे यांचा वाढदिवस होता परंतु वाढदिवसानिमित्त नुसता वाढदिवस साजरा करताना सामाजिक क्षेत्रात कार्य करणाऱ्या कोरोना योद्धांचा सन्मान करून त्यांना पुरस्कार देऊन आम्ही हा वाढदिवस साजरा केला आम्ही समाजातील विविध मान्यवरांना पुरस्कार प्रदान करून त्यांचे कौतुक केले यापुढे देखील आम्ही असेच सामाजिक आणि विधायक काम करणार असून गावातील नागरिकांना कोणत्याही समस्या असल्यास त्यांनी आमच्याशी संपर्क साधावा असे आवाहन समाजसेवक संतोष शिंदे यांनी याठिकाणी केले.