समाजसेवक दिलीप वागस्कर यांनी महिलांसोबत केली अनोखी भाऊबीज साजरी !!

समाजसेवक दिलीप वागस्कर यांनी महिलांसोबत केली अनोखी भाऊबीज साजरी !!

         घोडपदेव येथील समाजसेवक दिलीप वागस्कर आणि घोडपदेव समूह यांच्या संयुक्त विद्यमाने घोडपदेव येथील कापरेश्वर मंदिर येथे बहिणींसाठी अनोखी अशी हटके भाऊबीज केली या कार्यक्रमाचे आयोजन स्थायी समिती अध्यक्ष यशवंत जाधव आणि आमदार यामिनी यशवंत जाधव यांच्या प्रेरणेने करण्यात आले होते. या कार्यक्रमाला विभागातील बहिणींनी उस्फूर्तपणे सहभाग घेऊन हा कार्यक्रम यशस्वी केला या कार्यक्रमामध्ये भायखळा विधानसभा संघटक विजय दाऊ लिपारे, स्थानिक नगरसेवक रमाकांत रहाटे आणि समाजसेवक दिलीप वागस्कर यांनी विभागातील बहिणींना भेटवस्तू देऊन त्यांच्यासोबत भाऊबीज साजरी केली. यावेळी या सर्व बहिणींनी त्यांचे औक्षण करून त्यांची आरती ओवाळली. हा कार्यक्रम खरच पाहण्यासारखा होता. या समारंभात अपंगांना मोफत व्हील चेयर सायकलचे वाटप करण्यात आले. या समारंभात लहान मुलांना पोस्टाचे बचत पत्रे वाटप करण्यात आले.

      आम्ही दरवर्षी अशाप्रकारे अनोखी भाऊबीज साजरी करतो यामध्ये विभागातील महिलांसोबत भाऊबीज साजरी करून त्यांना एक भेट वस्तू देतो. तसेच निराधार व्यक्तींना देखील भाऊबीज निमित्त भेटवस्तू आणि मदत करण्याचे कार्य गेली अनेक वर्षे करत आलो असून यापुढे देखील आम्ही तसेच सामाजिक, शैक्षणिक आणि विधायक कामे करणार असल्याची माहिती विभागातील समाजसेवक दिलीप वागस्कर यांनी दिली. दिलीप वागस्कर यांनी केलेले कार्य उल्लेखनीय असून त्यांनी हा कार्यक्रम घेऊन विभागातील बहिणींसोबत ही अनोखी भाऊबीज साजरी करून हा नवीन विभागात पायंडा पडला असून अशाप्रकारे कार्यक्रम कुठेही होताना दिसत नाही त्यांच्या या कार्याला मी विशेष प्रशंसा करून त्यांना पुढील कार्यासाठी शुभेच्छा देतो आणि अभिनंदनही करतो त्यांनी असेच कार्य पुढे करत राहावे अशी अपेक्षा बाळगतो अशी माहिती भायखळा विधानसभा संघटक विजय लिपारे यांनी या समारंभात दिली या समारंभात विभागातील नागरिक मान्यवर मंडळी आणि शिवसेनेचे स्थानिक पदाधिकारी आणि महिला वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते.


Batmikar
मुंबई प्रतिनिधी - केतन खेडेकर

Most Popular News of this Week