काँग्रेस नेते शमीम अन्सारी यांनी भायखळा येथे गुणवंत विद्यार्थ्यांचा केला सत्कार !!

काँग्रेस नेते शमीम अन्सारी यांनी भायखळा येथे गुणवंत विद्यार्थ्यांचा केला सत्कार !!

          काँग्रेस नेते शमीम अन्सारी यांनी भायखळा आग्रीपाडा विभागातील गुणवंत विद्यार्थ्यांचा आग्रीपाडा येथील शमीम पॅलेस हॉलमध्ये गुणवंत विद्यार्थ्यांना मोफत टॅब देऊन त्यांचा सत्कार केला या समारंभात प्रमुख पाहुणे म्हणून काँग्रेसचे वरिष्ठ उपाध्यक्ष माजी आमदार मधू चव्हाण यांनी विशेष उपस्थिती लावली होती त्यांच्या हस्ते गुणवंत विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र आणि सन्मानचिन्ह देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला तसेच या समारंभामध्ये अपंग नागरिकांना मोफत व्हील चेयरचे वाटप करण्यात आले आम्ही विभागामध्ये नेहमी सामाजिक शैक्षणिक आणि क्रीडा विषयक कार्य करीत असतो लहान मुलांमधील कलागुणांना वाव मिळावा आणि त्यांची गुणवत्ता वाढावे या दृष्टिकोनातून आम्ही हा विद्यार्थ्यांसाठी सत्कार समारंभ आयोजित केला यापुढे देखील आम्ही विद्यार्थ्यांसाठी असेच शैक्षणिक कार्यक्रम राबवणार असल्याची माहिती काँग्रेस नेते शमीम अन्सारी यांनी या समारंभात दिली.

       शमीम अन्सारी यांचे कार्य मी गेल्या अनेक वर्षापासून पाहत असून ते नेहमीच सामाजिक शैक्षणिक कार्यक्रमांमध्ये अग्रेसर असतात त्यांनी विभागात एक हजारपेक्षा जास्त विद्यार्थ्यांना शैक्षणिक मदत केली असून त्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप केले आहे. विद्यार्थ्यांमध्ये शैक्षणिक गोडी निर्माण व्हावी आणि त्यांची गुणवत्ता वाढविणे या दृष्टिकोनाने त्यांनी हा विद्यार्थ्यांसाठी मोफत कार्यक्रम घेतला त्याबद्दल मी त्यांचे मनापासून आभार मानतो यापुढे देखील ते नेहमीच सामाजिक कार्य करत राहतील अशी आशा बाळगतो अशी माहिती काँग्रेसचे वरिष्ठ उपाध्यक्ष माजी आमदार मधु अण्णा चव्हाण यांनी दिली या समाजामध्ये काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष प्रमोद मांदरेकर, युवा नेते समीर चव्हाण युवा नेते अतिफ अन्सारी काँग्रेसचे कार्यकर्ते पदाधिकारी आणि मान्यवर मंडळी आणि विभागातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.


Batmikar
मुंबई प्रतिनिधी - केतन खेडेकर

Most Popular News of this Week