सुवर्णप्राशन शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद !!
महाराष्ट्र नवनिर्माण सेना प्रभाग क्रमांक 208 च्या वतीने घोडपदेव, राणीबाग परिसरामध्ये लहान मुलांसाठी सुवर्णप्राशन शिबिराचे आयोजन नुकतेच केले गेले. या शिबिरामध्ये सहा महिन्यापासून ते पंधरा वर्षांपर्यंतच्या लहान मुलांना आणि बालकांना मोफत सुवर्णप्रशन डोस देण्यात आला. या सुवर्ण प्राशन डोसचा फायदा असा आहे की लहान मुलांची स्मरणशक्ती वाढते तसेच भूक जास्त लागते तसेच आरोग्य सुदृढ राहते. सुवर्णप्राशन डोस कायमस्वरूपी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे देण्यात येणार आहे. या सुवर्ण संधीचा लाभ घ्यावा असे आवाहन महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रभाग क्रमांक 208 चे शाखा अध्यक्ष किरण टाकळे यांनी केले आहे. या शिबिराचे उद्घाटन मनसे नेते संजय नाईक यांच्या हस्ते करण्यात आले या शिबिराला भेट देण्यासाठी अनेक मान्यवर मंडळी तसेच मनसेचे अनेक पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.