वाल्मिकी नगरमधील एस.आर. ए परियोजनेला विद्यापीठाचा विरोध !!

वाल्मिकी नगरमधील एस.आर. ए परियोजनेला विद्यापीठाचा विरोध !!

      वांद्र्यात विविध ठिकाणी सरकारचे परियोजनाच्या अंतर्गत मोफत घरे देण्याचे काम सुरू आहे. पण वाल्मिकी नगर व भारत नगर मध्ये राहणाऱ्या झोपडी धारकांसाठी राबविण्यात येणाऱ्या योजनेला मुंबई विद्यापीठाचा सतत विरोध करत आहे. गेल्या 30 ते  35 वर्षांपासून राहणारे लोकांना बेघर करण्याचा प्रयत्न मुंबई विद्यापीठाच्या माध्यमातून करण्यात येत असल्याचा आरोप शनिवार (ता.16) ऑक्टोबर रोजी वाल्मिकी विकास एसआरए सहकारी गृहनिर्माण संस्थेच्या माध्यमातून मुंबई मराठी पत्रकार संघात आयोजित पत्रकार परिषदेत करण्यात आला.

     कायदेशीर मुंबई शहरामधील 2000 सालीचे पूर्वी राहणारे लोकांना मोफत घरे देण्याची योजना आहे परंतु सरकारच्या या योजनाला हाणून पडण्याचा डाव मुंबई विद्यापीठाच्या वतीने सुरू आहे. वाल्मिकी नगर व भारत नगर मध्ये मिळून 800 झोपडीधारकांना घरे आहेत. जर सरकारने आंम्हाला घरे दिली नाहीत तर रस्त्यावर राहण्याची वेळ आमच्यावर येईल. त्यामुळे सरकारने आंम्हा झोपडी धारकांना न्याय द्यावा अशी मागणी यावेळी करण्यात आली.


Batmikar
मुंबई प्रतिनिधी - केतन खेडेकर

Most Popular News of this Week