
कामगार नेते अनिल गणाचार्य यांच्यावर हृदय शस्त्रक्रिया यशस्वी !!
कामगार नेते अनिल गणाचार्य यांच्यावर हृदय शस्त्रक्रिया यशस्वी !!
मुंबई काँग्रेसचे सचिव महाराष्ट्र इंटकचे अध्यक्ष मुंबई इंटक चे माजी अध्यक्ष महाराष्ट्र राज्य कामगार संघटना संयुक्त कृती समितीचे पदाधिकारी व दक्षिण मध्य मुंबई जिल्हा काँग्रेस कमिटीचे नेते, कामगार नेते श्री अनिल गणाचार्य यांच्यावर नुकतीच माहीम येथील हिंदुजा रुग्णालयात हृदयावर शस्त्रक्रिया करण्यात आली. हॉस्पिटलचे हृदयतज्ञ डॉक्टर कौशल पांडे यांनी त्यांच्यावर शस्त्रक्रिया केली व डॉक्टर चंद्रशेखर यांनी ऍन्जिओग्राफी केली आता त्यांना घरी पाठविण्यात आले असून त्यांची तब्येत सुधारत आहे. सन 2010 मध्ये देखील त्यांना हृदयाचा त्रास होत होता परंतु त्यावेळेस त्यांनी इयत्ता कोल्हापूर येथे डॉक्टर जी पाटील यांच्याकडून लेझर ट्रीटमेंट आयुर्वेदिक पद्धतीने उपचार केले होते. त्यांना भेटण्यासाठी आणि तब्येतीची विचारपूस करण्यासाठी अनेक हितचिंतक मंडळी त्यांच्या घरी भेट देत आहेत.