
शिवसेना सचिव सुरज चव्हाण यांचा वाढदिवस जल्लोषात साजरा !!
शिवसेना सचिव सुरज चव्हाण यांचा वाढदिवस जल्लोषात साजरा !!
शिवसेनेचे सचिव सुरज चव्हाण यांचा वाढदिवस नुकताच दादर येथील शिवसेना भवन येथे उत्साहात साजरा करण्यात आला. चव्हाण यांना शुभेच्छा देण्यासाठी मुंबईतूनच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रातून शिवसेनेचे पदाधिकारी आणि शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. यामध्ये युवकांचे आणि युवतीचे प्रमाण सर्वाधिक होते. चव्हाण यांना शुभेच्छा देण्यासाठी अनेक मान्यवर मंडळी तसेच आमदार, नगरसेवक, पदाधिकारी यांनी हजेरी लावली. मी माझा वाढदिवस साजरा करत नाही परंतु युवा सैनिकांनी आणि पदाधिकाऱ्यांनी हा माझा वाढदिवस पुष्पगुच्छ देऊन साजरा केला. त्याबद्दल मी सर्व शिवसैनिकांचे आणि युवासैनिक यांचे मनापासून आभार मानतो. आपण शिवसेना पक्ष वाढवण्यासाठी फार जोमाने प्रयत्न करत आहात. तसेच शिवसेनेची विचारधारा घरापर्यंत पोचवण्यासाठी आपण यापुढे देखील काम केले पाहिजे. तळागाळातील नागरीकांना न्याय मिळाला पाहिजे अशी आपल्या पक्षाचे धोरण असून शिवसेना पक्षाचे काम महाराष्ट्रात आणखी जोरात पसरले पाहिजे माझ्या वाढदिवसानिमित्त आपण याठिकाणी पुष्पगुच्छ देऊन माझा उत्साह वाढवला त्याबद्दल मी आपले मनापासून आभार मानतो अशी माहिती शिवसेनेचे सचिव सुरज चव्हाण यांनी याठिकाणी दिली.
आम्ही चव्हाण यांचे काम गेल्या अनेक वर्षांपासून पाहत असून त्यांची पक्षासोबत एक सामाजिक निष्ठा आहे. सर्वाना सोबत घेऊन काम करण्याची त्यांची कार्यपद्धती आमच्या मनाला फार भावते. त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देऊन त्यांच्या कडून असेच सामाजिक कार्य घडो अशी प्रार्थना करतो अशी माहिती शिवसेनेचे परळ येथील नगरसेवक, माजी बेस्ट समिती अध्यक्ष अनिल कोकीळ यांनी दिली. या समारंभात अनेक मान्यवर मंडळी उपस्थित होते.