नगरसेविका सोनम मनोज जामसुतकर यांनी केले दलपत कोळी चौकाचे लोकार्पण !!

नगरसेविका सोनम मनोज जामसुतकर यांनी केले दलपत कोळी चौकाचे लोकार्पण !!

     शिवसेना उपनेते, माजी केंद्रीय मंत्री, खासदार अरविंदजी सावंत, शिवसेना उपनेते, बृहन्मुंबई महानगरपालिका स्थायी समिती अध्यक्ष यशवंत कमलाकर जाधव व भायखळ्याच्या आमदार यामिनी यशवंत जाधव यांच्या सहकार्याने शिवसेना माजी नगरसेवक मनोज पांडुरंग जामसुतकर यांच्या विशेष प्रयत्नाने माझगाव प्रभाग क्रमांक २१० मधील कै. दलपत कोळी चौकाचे सुशोभीकरण करण्यात आले. यावेळी महानगरपालिका उपायुक्त विजय बालमावर, शिवसेना मा.नगरसेवक सुर्यकांत पाटील, विधानसभा समन्वयक बबन गावकर, विधानसभा संघटक विजय लिपारे, विधानसभा संघटिका चंदना साळुंखे, उपविभागप्रमुख विजय कामतेकर, शाखाप्रमुख हेमंत मयेकर, मंजु कोळी व माझगाव-ताडवाडी येथील स्थानिक रहिवाशी मोठया संख्येने उपस्थित होते. या चौकाचे नूतनीकरण व्हावे ही स्थानिक रहिवासी यांची मागणी होती त्यानुसार या चौकाचे नूतनीकरण करून लोकार्पण करत असून यापुढे देखील अशीच सामाजिक आणि विधायक कार्य करत राहू अशी माहिती शिवसेनेचे माझगाव येथील माजी नगरसेवक आणि कामगार नेते मनोज जामसुतकर यांनी दिली.


Batmikar
मुंबई प्रतिनिधी - केतन खेडेकर

Most Popular News of this Week