
नगरसेविका सोनम मनोज जामसुतकर यांनी केले कै. हरिभाऊ वडगावकर चौकाचे लोकार्पण !!
नगरसेविका सोनम मनोज जामसुतकर यांनी केले कै. हरिभाऊ वडगावकर चौकाचे लोकार्पण !!
शिवसेना उपनेते, माजी केंद्रीय मंत्री, खासदार अरविंद सावंत, शिवसेना उपनेते, बृहन्मुंबई महानगरपालिका स्थायी समिती अध्यक्ष यशवंत कमलाकर जाधव आणि आमदार यामिनी यशवंत जाधव यांच्या उपस्थितीत माझगाव येथील हरिभाऊ वडगावकर चौकाचे सुशोभीकरण करून "दहीहंडीची पंढरी, माझगाव ताडवाडी" हे चौक साकारण्यात आले आहे. या चौकाचा लोकार्पण करून विभागातील नागरिकांना सौंदर्याचा सेल्फी पॉईंट निर्माण झाला असून नागरिकांना सेल्फी काढण्याचा मोह आवरता येत नाही आहे. या चौकाच्या माध्यमातून आम्ही नवीन सेल्फी पॉईंट तयार केला असून त्याचा लाभ विभागातील सर्व नागरिकांनी घ्यावा असे आवाहन माजी नगरसेवक मनोज जामसुतकर यांनी केले आहे. या प्रसंगी शिवसेना मा.नगरसेवक सुर्यकांत पाटील, विधानसभा समन्वयक बबन गावकर, विधानसभा संघटक विजय लिपारे, विधानसभा संघटिका चंदना साळुंखे, उपविभागप्रमुख विजय कामतेकर, शाखाप्रमुख हेमंत मयेकर, शाखा संघटक मेघा भोईर, उपशाखा संघटक विद्या राबडिया, माजी शाखाप्रमुख गणेश पाटील, उपशाखा संघटक मेघा चेंदवणकर, युवती अधिकारी श्रद्धा वाघमारे, उपशाखाप्रमुख रॉनी बगवाडिया, उपशाखाप्रमुख जेठालाल राठोड, उपशाखाप्रमुख जगदीश नलावडे, ग्राहक कक्ष अधिकारी देविदास माडीये, जेष्ठ शिवसैनिक राजेश सिंग, सलीम ता, किरण घोडके, महिला कार्यकर्त्यां बबिता पवार, कंकुबेन राबडिया, जमना अंजारा, सिमा यादव, स्वाती सावंत, सुनित हिंगे माझगाव ताडवाडी जेष्ठ नागरिक संघ तसेच माझगाव ताडवाडी मधील सर्व गोविंदा पथकातील प्रमुख प्रशिक्षक बाळा पडेलकर, अरुण पाटील, लहू पाटील, भारत पाटील, गणेश चव्हाण व माझगाव ताडवाडी येथिल स्थानिक सर्व रहिवाशी मोठया संख्येने उपस्थित होते.