भाजपा नेते प्रकाश पवार यांनी विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांच्या वाढदिवसानिमित्त वरळी येथे दिव्यांगांना मोफत केले वाटप !!

भाजपा नेते प्रकाश पवार यांनी विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांच्या वाढदिवसानिमित्त वरळी येथे दिव्यांगांना मोफत केले वाटप !!

      दिव्यांग नागरिकांना वरळी मध्ये मोफत  फिरत्या सायकलचे वाटप वाटप करण्यात आले. हा कार्यक्रम भाजपा माथाडी ट्रान्सपोर्ट जनरल कामगार आघाडीचे अध्यक्ष प्रकाश पवार यांनी घेतला होता. या कार्यक्रमांमध्ये 52 दिव्यांग व्यक्तींना मोफत व्हीलचेअर सायकलचे वाटप करण्यात आले.

      आम्ही दरवर्षी काही ना काही सामाजिक कार्यक्रम आयोजित करीत असतो भारतीय जनता पार्टीमध्ये नेत्यांचा वाढदिवस साजरा करण्याची प्रथा नसून त्यांचा वाढदिवस सामाजिक बांधिलकी जपूनच केला जातो त्याप्रमाणे आम्ही या ठिकाणी प्रवीण भाऊ दरेकर यांच्या वाढदिवसानिमित्त 52 दिव्यांग व्यक्तींना मोफत वाटप केले यापुढे देखील आम्ही अशाच प्रकारे सामाजिक आणि विधायक कार्य करत राहू असे आवाहन भारतीय जनता पार्टीचे नेते प्रकाश पवार यांनी याठिकाणी दिले समाजातील तळागाळातील घटकांपर्यंत भारतीय जनता पार्टी पोहोचण्याचा नियमित प्रयत्न करत असते त्या दृष्टिकोनातून आज माझ्या वाढदिवसानिमित्त माझे सहकारी प्रकाश पवार यांनी दिव्यांग व्यक्तींना मोफत वाटप करण्याचा आजचा चे उपक्रम घेतला आहे त्याला मी मनापासून शुभेच्छा देतो तसेच असे उपक्रम मुंबईमध्ये आणि महाराष्ट्रामध्ये ठिकाणी व्हावे असे आश्वासन मी भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांना देतो प्रकाश पवार यांनी केलेला स्तुत्य उपक्रम फार सुंदर असून त्यांना आम्ही पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देतो असे माहिती भारतीय जनता पार्टीचे नेते आणि विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी या समारंभात दिले या कार्यक्रमात आमदार  गोपीचंद पडळकर विभागातील नागरिक आणि इतर मान्यवर मंडळी उपस्थित होते.


Batmikar
मुंबई प्रतिनिधी - केतन खेडेकर

Most Popular News of this Week