वरळी येथे मेडिसिन वन या मेडिकलचे मान्यवरांच्या हस्ते उद्घाटन !!

       वरळी येथील मेडिसिन वन या मेडिकल चे उद्घाटन नुकतेच शिवसेनेचे खासदार अरविंद  सावंत, माजी आमदार सुनील शिंदे, बेस्ट समिती अध्यक्ष आशिष चेंबूरकर, प्रसिद्ध उद्योगपती अजय गुप्ता, समाजसेवक शिवसैनिक मुश्ताक नाखवा यांच्या हस्ते करण्यात आले. त्या समारंभांमध्ये विभागातील अनेक नागरिक आणि मान्यवर मंडळी उपस्थित होते. या मेडिकल चे वैशिष्ट्य म्हणजे नागरिकांना वीस टक्के डिस्काउंट मध्ये औषधे मिळणार असून नागरिकांनी या सेवेचा लाभ घ्यावा असे आवाहन मेडिसिन वन या मेडिकलचे मालक करन दोषी यांनी केले आहे. ही औषधे आपल्याला एका फोन द्वारे घरपोच देखील उपलब्ध होणार असून त्यावर देखील आपल्याला 20 टक्के सवलत मिळणार आहे. तरी आपण लाभ घ्यावा असे आवाहन खासदार अरविंद सावंत यांनी केले आहे. कोरोना काळामध्ये लागणारे औषधाच्या किमती फार महाग असून त्या मध्यमवर्गीय आणि गरीब नागरिकांना परवडत नाही त्यामुळे अनेक नागरिकांची मागणी होती औषधांचे दर कमी करावे त्यानुसार करन दोषी यांनी मेडिसीन वन दुकान उघडले असून 20 टक्के डिस्काउंट प्रमाणे औषध देणार आहेत त्यांचा हा उपक्रम स्तुत्य उपक्रम असून अशा प्रकारचे अनेक मेडीकल ठिकाणी उपस्थित झाले तर त्याचा लाभ गोर गरीब नागरिकांना मिळेल. त्यांच्या या कार्याचे कौतुक करून त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देतो अशी माहिती शिवसेनेचे माजी आमदार सुनील शिंदे यांनी दिली. करन दोषी यांनी हे मेडिकल सुरु करुन गरीब नागरिकांना स्वस्त दरात औषधे उपलब्ध करून दिली असून विभागातील नागरिकांनी या सेवेचा लाभ घ्यावा असे आवाहन शिवसेना नेते, समाजसेवक मुश्ताक नाखवा यांनी केले. या समारंभात विभागातील अनेक मान्यवर उपस्थित होते.


Batmikar
मुंबई प्रतिनिधी - केतन खेडेकर

Most Popular News of this Week