मनसेचे युवा नेते समाजसेवक महेश थोरात यांचा वाढदिवस साजरा !!

        भायखळा विभागातील प्रसिद्ध समाजसेवक आणि मनसेचे युवानेते महेशदादा थोरात यांचा वाढदिवस अत्यंत जल्लोष आणि उत्साहात साजरा करण्यात आला. या वाढदिवसाला त्यांनी विभागातील नागरिकांना मास्क आणि सॅनिटायजरचे  वाटप केले. तसेच लहान मुलांना खाऊ वाटप केले. या समारंभात विभागातील अनेक ज्येष्ठ मंडळी, विविध मंडळाचे पदाधिकारी आणि  कार्यकर्ते उपस्थित होते. त्यांनी देखील या वाढदिवसानिमित्त थोरात यांचे अभिष्टचिंतन केले. तसेच समाजसेवक दिलीप वागस्कर, भायखळा विधानसभा संघटक विजय दाऊ लिपारे यांनी विशेष उपस्थिती लावून थोरात यांना शुभेच्छा दिल्या. घोडपदेव आणि भायखळा परिसरातील विविध नवरात्र उत्सव मंडळांना भेट देऊन त्यांच्या समस्या थोरात यांनी जाणून घेतल्या या समस्यांचे निराकरण करण्यात येईल तसेच भविष्यात त्यांना कोणतीही अडचण असेल तर त्यांनी माझ्याशी संपर्क साधावा असे आवाहन समाजसेवक थोरात यांनी केले.


Batmikar
मुंबई प्रतिनिधी - केतन खेडेकर

Most Popular News of this Week