युवा समाजसेवक आकाश सोनवणे यांचा वाढदिवस धुमधडाक्यात साजरा !!
युवकांचे प्रेरणास्थान असलेले युवा मित्र समाजसेवक आकाश भाऊ सोनावणे यांचा वाढदिवस वरळी येथे धुमधडाक्यात साजरा करण्यात आला या समारंभामध्ये विभागातील अनेक नेते मंडळी, मित्र परिवार तसेच संस्थांच्या पदाधिकाऱ्यांनी आणि विविध मंडळांनी त्यांना पुष्पगुच्छ देऊन त्यांचे अभिष्टचिंतन केले. या समारंभामध्ये कोरोना बाबत जनजागृती म्हणून नागरिकांना मास्क आणि स्यानीटायझरचे वाटप करण्यात आले. सोनवणे यांना वाढदिवसानिमित्त शुभेच्छा देण्यासाठी अनेक मित्र परिवार तसेच त्यांचे चाहते मंडळी यांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती.
आम्ही दरवर्षी आमचा वाढदिवस हा अत्यंत सामाजिक आणि शैक्षणिक उपक्रम करून साजरा करत असतो यापुढे देखील आम्ही माझ्या वाढदिवसानिमित्त विविध समाजोपयोगी कार्यक्रमाचे आयोजन केले असून विद्यार्थ्यांनी पुढे येऊन विविध क्षेत्रांमध्ये आपले नाव लौकिक करावे आणि उंच भरारी घ्यावी अशा शुभेच्छा मी या ठिकाणी युवा वर्गाला देतो. तसेच त्यांना कोणतीही मदत लागली शैक्षणिक सामाजिक असेल क्रीडा असेल तर त्यांनी माझ्याशी संपर्क साधावा असे आवाहन युवा समाजसेवक आकाश सोनवणे यांनी या समारंभात केले.