
शिवसेनेची दक्षिण मुंबईत विनामूल्य महालसीकरण मोहिम !!
शिवसेनेची दक्षिण मुंबईत विनामूल्य महालसीकरण मोहिम !!
गेल्या दीड वर्षापासून कोरोनाच्या लाटेवर लाटा येत आहेत. पहिली गेली, दुसरी ओसरली. आता ऑक्टोबर महिन्यात तिसरी लाट येईल, असा इशारा राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापनाने दिल्यामुळे माझे कुटुंब, माझी जबाबदारी ही संकल्पना राबवणारे मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे, पर्यावरण मंत्री आदित्यजी ठाकरे यांच्या मार्गर्शनाखाली दक्षिण मुंबई मध्ये शिवसेनेने २३ ऑगस्ट ते २५ ऑगस्ट असे ३ दिवस नागरिकांचे आरोग्य आणि प्राण वाचवण्याच्या दृष्टीने व्यापक प्रमाणात महालसीकरण मोहिम राबवली, त्याला मुंबईकरांचा भरघोस प्रमाणत प्रतिसाद मिळाला.
या मोहिमेचा शुभारंभ शिवसेना खासदार अनिल देसाई यांच्या हस्ते शारदा सदन शाळेत झाला. त्यावेळी शिवसेना दक्षिण मुंबई विभाखप्रमुख पांडुरंग सकपाळ, २१८ चे शाखाप्रमुख निलेश (बाळा) अहिरेकर, ज्येष्ठ पत्रकार प्रवीण मंत्री, मा. नगरसेवक दिलीप नाईक, महिला शाखा संघटिका सौ. नयना देहेरकर, लता गांधी, समस्त पदाधिकारी, शिवसैनिक, युवासैनिक उपस्थित होते. दोन दिवसांत शिवसेना शाखाक्रमांक २१८ येथे १९५० लोकांचे, दक्षिण मुंबईतील इतर शिवसेना शाखांमध्ये हजारो लोकांचे विनामूल्य महालसीकरण झाले.