ऐतिहासिक संस्कृतीचे जतन हे आपले कर्तव्य - नगरसेविका सोनम मनोज जामसुतकर !

ऐतिहासिक संस्कृतीचे जतन हे आपले कर्तव्य - नगरसेविका सोनम मनोज जामसुतकर !

       ऐतिहासिक वास्तूचे जतन करणे हे आपले कर्तव्य असून त्यांची जपवणूक करणे आणि तो वारसा नव्या पिढीला समजून सांगणे आपले आद्यकर्तव्य असल्याची माहिती शिवसेना प्रभाग क्रमांक 210 च्या नगरसेविका सोनम जामसुतकर यांनी दिली. माझगाव येथिल सैफी पार्क येथे ऐतिहासिक मैलाचे दगडाचे जतन समारंभात ज्येष्ठ महिलेच्या हस्ते नारळ वाढवून या कामाच्या सुशोभीकरणाचे कार्याचा शुभारंभ करण्यात आला. या समारंभात अनेक नागरिक ज्येष्ठ महिला वयोवृद्ध नागरिक आणि तरुण मोठ्या संख्येने उपस्थित होते.



        स्थानिक नगरसेविका सौ.सोनम मनोज जामसुतकर व शिवसेना मा. नगरसेवक श्री.मनोज पांडुरंग जामसुतकर यांच्या विशेष प्रयत्नाने तसेच बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या वतीने हे सुशोभीकरणाचे काम करण्यात येत आहे.

        या प्रसंगी शिवसेना भायखळा विधानसभा समन्वयक श्री.बबन गावकर, विधानसभा संघटक श्री. विजय (दाऊ) लिपारे, महिला संघटक सौ.चंदना साळुंखे, मा.नगरसेवक श्री.सुर्यकांत पाटील, उपशाखाप्रमुख श्री. जगदीश नलावडे, उपशाखाप्रमुख श्री. जितेंद्र बोरीचा,उपशाखाप्रमुख श्री. जेठाभाई राठोड, उद्योजक समाजसेवक मुश्ताक नाखवा, श्री.अजय गुप्ता, शिवसैनिक तसेच माझगावचे स्थानिक रहिवाशी मोठ्या संख्येने उपस्थित होते.


Batmikar
मुंबई प्रतिनिधी - केतन खेडेकर

Most Popular News of this Week