सायन माटुंगा सिटीझन फोरम तर्फे अमृतमहोत्सवी 75 वा स्वातंत्र्य दिन साजरा !!

          देशाच्या स्वातंत्र्यासाठी बलिदान केलेल्या स्वातंत्र्यवीरांना हा भारत देश कधीच विसरू शकत नाही व नवीन पिढीने देखील त्यांना विसरता कामा नये असे प्रतिपादन कामगार नेते व मुंबई काँग्रेसचे चिटणीस श्री अनिल गणाचार्य यांनी 75 व्या स्वातंत्र्य दिन ध्वजारोहण कार्यक्रमा निमित्त सायन माटुंगा सिटीझन फोरम तर्फे सायन हॉस्पिटल शेजारील वेल्फेअर सेंटर येथे ध्वजारोहण करते वेळेस व्यक्त केले.

      कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी नगरसेवक उपेन्द्र पी दोशी आणि काँग्रेस नेते उपस्थित होते त्यांनी देखील राष्ट्रीय नेत्यांनी केलेल्या त्यागाबद्दल उल्लेख केला व हे स्वातंत्र्य टिकविणे गरजेचे आहे असे म्हणाले.

      कार्यक्रमाला सन्माननीय पाहुणे म्हणून श्री हुकुम राज मेहता अध्यक्ष -दक्षिण मध्य मुंबई जिल्हा काँग्रेस कमिटी, श्री जगदीशभाई शहा समाज सेवक, नगरसेविका रेखा दोशी आणि माजी नगरसेविका नयना दोषी हे उपस्थित होते.

       विशेष अतिथी म्हणून श्री विनोद शिवकर अध्यक्ष 172 ब्लॉक काँग्रेस कमिटी आणि श्री एजाज भाई अन्सारी, जिल्हा पदाधिकारी हजर होते. श्री विनोद शिवकर यांनी मार्गदर्शन केले व आभार प्रदर्शन व्यक्त केले. त्याच बरोबर अनेक ब्लॉक कांग्रेस पदाधिकारी व सायन माटुंगा सिटीजन फोरमचे पदाधिकारी व नागरिकांनी कार्यक्रमाला हजर राहून उस्फुर्त साथ दिली.


Batmikar
मुंबई प्रतिनिधी - केतन खेडेकर

Most Popular News of this Week