
अमृत महोत्सवी स्वातंत्र्य दिना निमित्त माजी आमदार मधू चव्हाण यांनी केले ध्वजारोहण !!
अमृत महोत्सवी स्वातंत्र्य दिना निमित्त माजी आमदार मधू चव्हाण यांनी केले ध्वजारोहण !!
भायखळा विधानसभा मतदार संघाच्यावतीने अमृत महोत्सवी "स्वातंत्र्य दिना" निमित्त पॅलेस सिनेमाजवळ, भायखळा (पू) येथे मा.अध्यक्ष-म्हाडा मुंबई काँग्रेसचे उपाध्यक्ष मा.आमदार श्री.मधु अण्णा चव्हाण यांच्या शुभहस्ते ध्वजारोहण कार्यक्रम संपन्न झाला. याप्रसंगी चव्हाण यांनी विभागातील नागरिकांना स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा दिल्या. देशातील जनतेने कोणत्याही अफवांवर विश्वास न ठेवता या देशात सामाजिक एकता अखंडता एकात्मता कशाप्रकारे टिकून राहील यावरच लक्ष द्यायचे आहे कारण की या देशात आलेल्या धर्मांध शक्तींनी या देशांमध्ये भांडण लावायचे काम केले असून जातीजातीमध्ये द्वेष निर्माण केला आहे तरी मी देशातील जनतेला आव्हान करतो की आपण अशा धर्मांध शक्तीला कुठे ही बळी न पडता समाजात एकोप्याने आणि सामाजिक एकात्मतेने नांदावे असे आवाहन काँग्रेसचे वरिष्ठ उपाध्यक्ष माजी आमदार मधू चव्हाण यांनी स्वागत केले या उत्सवात काँग्रेसचे पदाधिकारी-कार्यकर्ते, स्थानिक नागरिक व हितचिंतक मोठ्या संख्येने उपस्थित होते.