शिवसेनेने दिले कफ परेड येथील नागरिकांना कोवॅक्सिनचे मोफत डोस !!
कफ परेड, कुलाबा विभागातील नागरिकांना मोफत लस उपलब्ध व्हावी या हेतूने कफ परेड येथील g.d. सोमानी शाळा या ठिकाणी कुलाबा विधानसभा, विभाग प्रमुख पांडुरंग सकपाळ कृष्णा पवळे आणि शाखा प्रमुख संतोष पवार यांनी रिलायन्स फाउंडेशनच्या माध्यमातून मोफत लसी उपलब्ध करून स्थानिक नागरिकांना दिलासा दिला. या लसीकरणाच्या माध्यमातून दोन हजार पेक्षा जास्त नागरिकांनी या ठिकाणी येऊन लसीकरण करून घेतले. हे लसीकरण करताना कोणत्याही प्रकारचे शुल्क त्यांच्या कडून न घेता त्यांना हे लसीकरण मोफत करण्यात आले. लसीकरण करून घेण्यासाठी विभागातील नागरिकांनी लांबच्या लांब रांगा लावल्या होत्या. तसेच झोपडपट्टीतील रहिवासी तसेच हातावर पोट असणारे कामगार मच्छिमार महिलांनी देखील या ठिकाणी उपस्थित राहून आपल लसीकरण करून घेतले. या मोहिमेत प्रत्येक नागरिकांना कोवॅक्सिनचे डोस मोफत देण्यात आले.
शिवसेना पक्षप्रमुख, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी महाराष्ट्रातून तसेच देशातून कोरोनाला हद्दपार करण्याची प्रतिज्ञा घेतली आहे, त्यानुसारच पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच विभागप्रमुख पांडुरंग सकपाळ यांच्या नेतृत्वाखाली या ठिकाणी आम्ही महालसिकरण मोहीम हाती घेतली असून ही लस आम्ही नागरिकाना अगदी मोफत देत असून सर्व नागरिकांनी या ठिकाणी येऊन आपले लसीकरण करून घेतलं असून कोरोनाला हद्दपार करण्याची आम्ही प्रतिज्ञा घेतली आहे अशी माहिती शिव भारतीय पोर्ट सेनेचे अध्यक्ष कृष्णा पवळे आणि शाखाप्रमुख संतोष पवार यांनी दिली. या लसीकरण शिबिराला खासदार अरविंद सावंत, खासदार अनिल देसाई, जयश्री बाळीकर, विभागप्रमुख पांडुरंग सकपाळ तसेच अनेक नगरसेवक, सामाजिक संस्था आणि मंडळ यांनी भेट देऊन या उपक्रमाचे कौतुक केले.