महालसीकरण मोहिमेला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद !!
विभागातील नागरिकांना लस उपलब्ध व्हावी या हेतूने तिसरा कुंभारवाडा या ठिकाणी मुंबादेवी विधानसभा, विभाग प्रमुख पांडुरंग सकपाळ आणि शाखाप्रमुख वैभव मयेकर यांनी रिलायन्स फाउंडेशनच्या माध्यमातून लसी उपलब्ध करून स्थानिक नागरिकांना दिलासा दिला. या लसीकरणाच्या माध्यमातून दोन हजार पेक्षा जास्त नागरिकांनी या ठिकाणी येऊन लसीकरण करून घेतले. हे लसीकरण करताना कोणत्याही प्रकारचे शुल्क त्यांच्याकडून न घेता त्यांना हे लसीकरण मोफत करण्यात आले. लसीकरण करून घेण्यासाठी विभागातील नागरिकांनी लांबच्या लांब रांगा लावल्या होत्या. तसेच महिलांनी देखील या ठिकाणी उपस्थित राहून आपल लसीकरण करून घेतले. या मोहिमेत प्रत्येक नागरिकांना कोवॅक्सिनचे डोस देण्यात आले. शिवसेना पक्षप्रमुख, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी महाराष्ट्रातून तसेच देशातून कोरोनाला हद्दपार करण्याची प्रतिज्ञा घेतली आहे त्यानुसारच पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच विभागप्रमुख पांडुरंग सकपाळ यांच्या नेतृत्वाखाली या ठिकाणी आम्ही महालसिकरण मोहीम हाती घेतली असून ही लस आम्ही नागरिकांना अगदी मोफत देत असून सर्व नागरिकांनी या ठिकाणी येऊन आपले लसीकरण करून घेतलं असून कोरोनाला हद्दपार करण्याची आम्ही प्रतिज्ञा घेतली आहे अशी माहिती शिवसेनेचे कुंभारवाडा येथील शाखाप्रमुख वैभव मयेकर यांनी दिली. या लसीकरण शिबिराला खासदार अरविंद सावंत, खासदार अनिल देसाई, जयश्री बाळीकर, माजी नगरसेविका युगंधरा साळेकर, तसेच अनेक नगरसेवक, सामाजिक संस्था आणि मंडळ यांनी भेट देऊन या उपक्रमाचे कौतुक केले.