अखिल भारतीय मराठा महासंघाचे कार्यालय दादर येथे स्थलांतरित !

अखिल भारतीय मराठा महासंघाचे कार्यालय दादर येथे स्थलांतरित !

          १२० वर्ष मुंबईतील गिरगांव प्रार्थना समाज येथील अखिल भारतीय मराठा महासंघ (क्षत्रिय मराठा समाज) कार्यालयाच्या इमारतीचे नूतनीकरण करावयाचे असल्यामुळे तात्पुरते नवीन कार्यालय शिवनेरी सभागृह, शिवाजी मंदिर, दादर येथे स्थलांतरित केले आहे. नूतन कार्यालयाचा उदघाटन समारंभ शुक्रवार दिनांक ०६ ऑगस्ट रोजी संध्याकाळी संपन्न झाला. त्याप्रसंगी अखिल भारतीय मराठा महासंघाचे अध्यक्ष ॲड. शशिकांत पवार, अखिल क्षत्रिय महासभाचे महाराष्ट्र मंत्री प्रेमपाल सिंह, संयुक्त सरचिटणीस दिलीपसिंह जगताप, महासंघाचे खजिनदार एस आर सावंत, महासंघाचे जनसंपर्क अधिकारी प्रवीण मंत्री, मराठा क्रांतीमोर्चाचे युवा नेते विरेंद्र पवार, हॉटेल इंडस्ट्रीचे समीर कदम, मुंबई प्रदेश अध्यक्ष महेश सावंत, जयवंत विचारे, सुनील नलावडे, ठाणे आणि पालघर जिल्ह्याचे नाका कामगार आघाडी सांभाळणारे सचिव राजेंद्र बोराडे, संघटक सचिव विजय पात्रे, कार्यालयीन प्रमुख लता निकम व अंगणवाडी सेविका दीपाली आणि कार्यकर्ते उपस्थित होते.

       अखिल भारतीय मराठा महासंघाच्या गिरगांव येथील नूतन इमारतीचा भूमिपूजन समारंभ गुरुवार दिनांक १९ ऑगस्ट रोजी सकाळी आयोजित करण्यात आलेला आहे, याची मराठा कार्यकर्त्यांनी नोंद घ्यावी असे कळविण्यात आलेले आहे.


Batmikar
मुंबई प्रतिनिधी - केतन खेडेकर

Most Popular News of this Week