कोकणातील खेड शहरात मुंबई काँग्रेसने जीवनावश्यक वस्तूंचे केले वाटप !!

कोकणातील खेड शहरात मुंबई काँग्रेसने जीवनावश्यक वस्तूंचे केले वाटप !!

      महाराष्ट्रातील कोकण व पश्च‍िम महाराष्ट्रात अतिवृष्टीमुळे अनेक गावे जलमय होऊन अनेकांचे संसार उद्ध्वस्त झाले. कोकणातील पूरग्रस्तबाधीतांना मदतीचा हात म्हणून मुंबई काँग्रेसतर्फे खेड, जि.रत्नागिरी येथे मदत सामग्रीचे वाटप मुंबई काँग्रेसचे वरिष्ठ उपाध्यक्ष मा.आमदार श्री.अण्णा मधु चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले. याप्रसंगी मधु चव्हाण यांनी स्थानिक नागरिकांशी चर्चा करुन झालेल्या नुकसानीबाबत माहिती घेतली. सामग्री वाटप कार्यक्रमामध्ये मुंबई काँग्रेसचे बिपीन विचारे, मंझूर बगदादी, समीर चव्हाण, मिलींद घोडेकर तसेच खेड शहर तालुका काँग्रेस अध्यक्ष खतीब गौस, बशीर मुजावर व काँग्रेस पदाधिकारी-कार्यकर्ते उपस्थित होते.


Batmikar
मुंबई प्रतिनिधी - केतन खेडेकर

Most Popular News of this Week