भाटिया हॉस्पिटल मध्ये विश्वस्तां विरोधात आक्रोश आंदोलन !

भाटिया हॉस्पिटल मध्ये विश्वस्तां विरोधात आक्रोश आंदोलन !

        सामान्यांना उध्वस्त करणारी कोरोना ची दुसरी लाट आटोक्यात आली असताना मुंबई मधील भाटिया हॉस्पिटल मध्ये विश्र्वस्तांच्या मनमानी कारभारा विरोधात कामगारांनी आक्रोश आंदोलन करून संताप व्यक्त केला . 

       भाटिया हॉस्पिटलला ८२ वर्षे पूर्ण झाली असून विश्र्वस्तांच्या तीन पिढ्यांनी पूर्ण सहकार्य केले असतानाच आता विश्र्वतांच्या परदेशातून शिकून आलेल्या चौथ्या पिढीने हॉस्पिटलचे काही विभाग कंत्राटी पद्धतीने  सुरू करण्याचा घाट घातला असून २५ ते ३० वर्ष काम करणाऱ्या कायम स्वरुपी कर्मचाऱ्यांना घरी बसविणे षडयंत्र आखले असल्याचा आरोप भाटिया जनरल हॉस्पिटल चे सरचिटणीस दिलीप जगताप यांनी केला आहे. या विरुद्ध त्यांनी हॉस्पिटल मध्ये कामगारांसह काळ्या फिती लावून विश्र्वस्तांच्या मनमानी कारभाराविरुद्ध आंदोलन केले. हॉस्पिटल आर्थिक दृष्ट्या फायदेशीर असताना सुद्धा फार्मसी विभाग कंत्राटी पद्धतीवर देवून कायम कामगारांना जबरदस्तीने सेवा निवृत्त्त करून त्या जागी १०००० वेतना वरती कंत्राटी कामगारांची भरती करणार असल्याचे देवांशी मेहता आणि राहुल ठाकरसी यांनी ठरविल्याचे कळते. 

          हळूहळू इतर विभागात सुद्धा याच पद्धतीने मनमानी कारभार करून कायम स्वरुपी कामगारांना देशोधडीला लावण्याचा प्रकार विश्वस्त करीत असल्याची भीती युनियन कमिटी अध्यक्ष मदन पारते, संदीप पाटील, महेंद्र गुरव यांनी व्यक्त केली.

       विश्वस्त देवंशी मेहता हे दुबईस्थित असून तिथूनच व्हिडिओ कॉन्फरन्स द्वारे इतर विश्र्वस्तांशी संपर्क करत असतात, या सर्व प्रकरणा विरुद्ध भाटिया एम्प्लॉइ युनियन चे अध्यक्ष आणि आमदार भाई जगताप यांनी निर्वाणीचा इशारा दिला असून विश्र्वस्तांच्या या मनमानी कारभार विरोधात औद्योगिक न्यायालयात दाद मागत असल्याचे सांगितले. 

        या आक्रोश आंदोलनामध्ये एस टी काँग्रेस कामगार युनियनचे सरचिटणीस श्रीरंग बर्गे, महासंघाचे जनसंपर्क अधिकारी प्रवीण मंत्री, संघटक सचिव सुरेश कुरे, भाजीपाला समितीचे अध्यक्ष विनायक घाडगे आदी उपस्थित होते .


Batmikar
मुंबई प्रतिनिधी - केतन खेडेकर

Most Popular News of this Week