
मुख्यमंत्र्यांच्या वाढदिवसानिमित्त हिंदुस्तान माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार सेनेतर्फे विविध उपक्रम !!
मुख्यमंत्र्यांच्या वाढदिवसानिमित्त हिंदुस्तान माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार सेनेतर्फे विविध उपक्रम !!
शिवसेना पक्षप्रमुख आणि राज्याचे मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त दक्षिण मुंबईत विविध उपक्रम हिंदुस्तान माथाडी ट्रान्सपोर्ट अँड जनरल कामगार सेनेच्या वतीने राबविण्यात आले होते.
छत्रपती शिवाजी टर्मिनस येथील आझाद मैदानात लगत असलेल्या कुटुंब शासकीय आहार केंद्रातील महिलांना स्टीमर चे वाटप करून या कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली, अशाच प्रकारचे दक्षिण मुंबईत वाटप करण्यात आल्याचे विकास मयेकर यांनी सांगितले तर क्रॉफर्ड मार्केट येथे संघटनेच्या हक्काचे नामांकन शिवसेनेचे नेते माझी बेस्ट समिती अध्यक्ष श्री अरुण दुधवडकर यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी मोठ्या संख्येने शिवसैनिक आणि हितचिंतक उपस्थित होते. राज्यभरात ज्याठिकाणी पूरग्रस्त परिस्थिती आहे अशा ठिकाणी हिंदुस्तान माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार सेनेच्या वतीने मोफत ऑक्सीजन सिलेंडरचा पुरवठा पाठवण्यात आला आहे.
उपरोक्त कार्यक्रमास शिवसेना प्रणित हिंदुस्तान माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार सेनेचे अध्यक्ष श्री. विकास मयेकर, संयुक्त सरचिटणीस शंकर झोरे, चिटणीस सुरेश कोळी, बाजीराव, इमरान लाला, शकील कुरेशी आदी मान्यवर उपस्थित होते.