लावणीसम्राज्ञी सुलोचना चव्हाण यांचे ८९व्या वर्षात पदार्पण !

लावणीसम्राज्ञी सुलोचना चव्हाण यांचे ८९व्या वर्षात पदार्पण !

        लावणीसम्राज्ञी म्हणून लोकप्रिय असलेल्या सुप्रसिद्ध गायिका सुलोचना चव्हाण या दि.१३ मार्च रोजी वयाची ८८ वर्षे पूर्ण करुन ८९व्या वर्षात पदार्पण करीत आहेत. 

       वयाच्या सहाव्या सातव्या वर्षापासून स्थानिक नाटक कंपनीतून कृष्णाच्या भूमिकेतून रंगमंचावर आलेल्या सुलोचनाताईंनी गुजराथी, हिंदी उर्दू नाटकातूनही भूमिका केल्या. 

        ‘नाव गाव कशाला पुसता अहो मी आहे कोल्हापूरची... ही ‘रंगल्या रात्री’ चित्रपटातील त्यांची पहिली लावणी प्रचंड लोकप्रिय ठरली. त्यानंतर त्यांनी कधी मागे वळून पाहिले नाही. तुझ्या उसाला लागंल कोल्हा..., पदरावरती जरतरीचा मोर नाचरा हवा..., सोळावं वरीस धोक्याचं..., कसं काय पाटील बरं हाय का... या त्यांच्या लावण्या प्रचंड लोकप्रिय झाल्या. आचार्य अत्रे यांनी त्यांना ‘लावणीसम्राज्ञी’ हा किताब दिला. 

        सुलोचनाताईंनी हिंदी सिनेमासाठी देखील अनेक गाणी गायीली. त्यांचे हिंदी गीतांचे अल्बम देखील निघाले. अनेक संस्थांच्या मदतीसाठी त्यांनी विनामूल्य कार्यक्रम केले. त्यांनी आपल्या यशाचे श्रेय सदैव आपले पती एस. चव्हाण यांना दिले. त्यांचे चिरंजीव विजय चव्हाण हे सुप्रसिद्ध ढोलकी वादक आहेत.

         २०१० साली त्यांना महाराष्ट्र शासनाने गानसम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार देऊन सन्मानीत केले. त्यांना इतरंही अनेक पुरस्कार मिळाले.


Batmikar
मुख्य वार्ताहर - रवींद्र भोजने

Most Popular News of this Week