दिवंगत रामचंद्र शंकर निरभवणे यांचा सर्वोदय बुद्ध विहार जडणघडणीत मोलाचा वाटा !

दिवंगत रामचंद्र शंकर निरभवणे यांचा सर्वोदय बुद्ध विहार जडणघडणीत मोलाचा वाटा !

          दिवंगत रामचंद्र शंकर निरभवणे यांचा सर्वोदय बुद्ध विहार जडणघडणीत मोलाचा वाटा आहे असे पुज्य भदंत राहुल बोधी महाथेरो यांनी दिवंगत रामचंद्र शंकर निरभवणे यांना श्रद्धांजली वाहताना म्हटले आहे. रामचंद्र शंकर निरभवणे यांचे वयाच्या ७७ व्या वर्षी दि १६ डिसेंबर रोजी निधन झाले आहे त्यांच्या पाठीमागे पत्नी, तीन मुले, तीन भाऊ, पुतणे, पुतण्या, सुना, नातवंडे असा मोठा परिवार आहे.

     त्यांच्या पुण्यानुमोदन व शोकसभेचा कार्यक्रम रविवार दि. २० डिसेंबर रोजी जेतवन बुद्ध विहार, तांबे नगर, मुलुंड पश्चिम येथे पुज्य भदंत राहुल बोधी महाथेरो यांचे उपस्थितीत संपन्न झाला त्यावेळी ते बोलत होते त्यावेळी पुढे बोलताना भदंत राहुल बोधी महाथेरो म्हणाले की, दिवंगत रामचंद्र शंकर निरभवणे हे मुंबई महापालिकेच्या दुकाने व आस्थापना खात्याचे प्रमुख ८ वर्षं सांभाळून २००२ मध्ये सैवानिवृत्त झाले होते गेल्या २५-३० वर्षांपासून सर्वोदय महाबुद्ध विहार आणि भिख्खू संघाज युनायटेड बुद्धिस्ट मिशन ह्या संस्थाबरोबर त्यांचे नाते निर्माण झाले होते त्यांनी अनेक संस्थांचे पद भूषविले होते त्यांना धम्म कार्याची आवड होती धम्म कार्यात ते तन मन धनाने सहभागी व्हायचे. मुलुंड परिसरातील बुद्ध विहाराना त्यांनी धम्मदान केले आहे. धम्म कार्याला अनुसरून अनेक गरजू संस्थांना वेळोवेळी सढळ हस्ते धम्म दान केले आहे दरवर्षी बुद्ध गयेला  धम्म यात्रेला जात असत ते थायलंड या देशात झालेल्या जागतिक धम्म परिषदेला उपस्थित होते ते कायम ताठ मानेने जगले त्यामुळे ह्या आजारातही कुणावर अवलंबून राहावे लागु नये म्हणून त्यांनी जगाचा निरोप घेतला असावा आयुष्याच्या शेवटच्या क्षणापर्यंत ते स्वाभिमानाने जीवन जगले आहेत यावेळी नगरसेवक प्रकाश गंगाधरे, नंदु,वैती, नगरसेविका हर्षिला मोरे, मिलिंद शिशुपाल, शशिकांत भालेराव, वसंत गांगुर्डे, हेमंत गांगुर्डे, सुरेंद्र बर्वे, बाबु  साळवी, जेतवन बुद्ध विहार समितीचे अध्यक्ष अहिरे, सुभाष गुरुचल, राहुल निरभवणे आदी विविध मान्यवरांनी रामचंद्र शंकर निरभवणे यांना श्रद्धांजली अर्पण केली यावेळी त्यांचे कुटुंबीय, नातेवाईक आणि मित्र परिवार मोठ्या संख्येने उपस्थित होते.


Batmikar
मुख्य वार्ताहर - रवींद्र भोजने

Most Popular News of this Week