अभिनेत्री नयना हडकरने कॅन्सर रूग्णांना अन्नदान करून जपली आपली सामाजिक बांधिलकी !

अभिनेत्री नयना हडकरने कॅन्सर रूग्णांना अन्नदान करून जपली आपली सामाजिक बांधिलकी !

        कोविड -१९ महामारीच्या संकटाने संपूर्ण जगाला ग्रासले असून याला आपला भारत देशही अपवाद नाही. आपल्या भारतातही गेल्या १६ महिन्यांपासून लाॅकडाऊन सुरू असून या लाॅकडाऊनमुळे अनेक उद्योगधंदे व व्यवसाय बंद असल्यामुळे अनेकांचे रोजगार बुडाले आहेत. यामुळे अनेकांवर उपासमारीची पाळी आली आहे.

      आपल्या महाराष्ट्र सरकारने अनलाॅकची प्रक्रिया सुरू केली असून यामुळे काही प्रमाणात व मर्यादित वेळेत उद्योग व व्यवसाय सुरू झाले असले तरी या लाॅकडाऊनमध्ये अनेकांच्या नोक-या व रोजगार  गेल्यामुळे त्यांना आता कोविड महामारीच्या संकटाबरोबरच बेकारीच्या संकटाचाही सामना करावा लागत आहे. यामुळे अनेकांना दैनंदिन जीवनातील अनेक समस्यांना तोंड द्यावे लागत आहे.

     अशा या संकटाच्या परिस्थितीतही या गरीब व गरजू लोकांना आशेचा किरण म्हणजे अनेक सामाजिक संस्था व दानशूर व्यक्ती सामाजिक भावनेतून या लोकांना आपापल्यापरीने जमेल तशी मदत करीत आहेत. यामुळे अशा गरीब व गरजू लोकांना एकप्रकारे दिलासाच मिळत आहे. अशातच एका युवतीने आपला वाढदिवस आपल्या मित्र -मैत्रिणींसोबत करण्याऐवजी तिने निवारा नसल्यामुळे फुटपाथवर रहाणा-या कॅन्सरपिडीत रूग्ण आणि त्यांच्या नातेवाईकांना अन्नदान करून साजरा केला. या युवतीने आपल्या या कृतीतून समाजासमोर एक आदर्शच ठेवला असल्याचे‌ बोलले जात आहे.

     या युवतीचे नाव नयना हडकर असे असून नयना ही एक सिने अभिनेत्री आहे तिने काही चित्रपट, चित्रवाहिन्या आणि संगीत अल्बमसाठीही काम केलेले आहे. कोरोना संकटकाळामुळे अनेकांची होत असलेली उपासमार तिला पहावली नाही म्हणून तिने अशा लोकांसाठी काहीतरी करायला हवे या सामाजिक भावनेतून तिने आपल्या मित्र व मैत्रिणींसोबत आपला वाढदिवस साजरा करून मौजमजा करण्या ऐवजी तिने निवा-या अभावी फुटपाथवर रहाणा-या कॅन्सर पिडीत रूग्ण व त्यांच्या नातेवाईकांना अन्नदान करून आपला वाढदिवस साजरा केला. अभिनेत्री नयना हडकरच्या या सामाजिक जाणिवेचे सर्वच थरातून कौतुक होत आहे.


Batmikar
मुंबई प्रतिनिधी - केतन खेडेकर

Most Popular News of this Week