पूरग्रस्त बाधित मूर्तिकारांना- मुंबईस्थित मूर्तिकारांचा मदतीचा हात...

पूरग्रस्त बाधित मूर्तिकारांना- मुंबईस्थित मूर्तिकारांचा मदतीचा हात...

       नुकत्याच झालेल्या अतिवृष्ठी मुळे महाराष्ट्र राज्यातील कोकण, महाड, चिपळूण, रत्नागिरी, सिंधुदुर्ग भागात, मूर्तिकारांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. त्यांना  मदतीची फारच गरज आहे. हे लक्षात घेऊन, श्री गणेश मूर्तिकार कामगार संघटना, मुंबई यांनी तयार गणेश मुर्त्या अतिवृष्टीमुळे बाधित पूरग्रस्त मूर्तिकारांना देऊन त्यांना आधार देऊन त्यांचे मनोबल वाढविण्याचे योजले आहे.

          मुंबई व उपनगर मधील गणेश मूर्तिकारांनी १ ते २ फुटाच्या शाडू माती, लालमाती, अथवा कागदी (पेपर पल्प) स्वरूपातील पूर्ण रंगविलेल्या मुर्त्या, प्लास्टिक पिशवीत सुस्थितीत झाकून, यथाशक्ती किती गणेश मुर्त्याची मदत करू शकता याबाबत आगाऊ नोंदणी संघटनेच्या खालील सभासदांकडे करावी. आपण देणार असलेल्या मुर्त्या फक्त गणेश मूर्तींचे महापुरात नुकसान झालेल्या मूर्तिकारांना दिल्या जातील असे आवाहन श्री गणेश मूर्तिकार कामगार संघटना, मुंबई (महाराष्ट्र) यांनी पत्रकाद्वारे केले.

       अधिक माहिती साठी संपर्क :

१)  सुरेश शर्मा

          9969687242

२)  निलेश नेवाते

          9892702714

३)  साईभाई रामपूरकर

          सामाजिक कार्यकर्ता


Batmikar
वरिष्ठ पत्रकार - बाळ पंडित

Most Popular News of this Week