वैभवशाली मराठी भाषा !!

वैभवशाली मराठी भाषा !!

       संगणक युगात, संगणक जीवन, तुम्ही कोण नी आम्ही कोण? २१ व्या शतकाची वाटचाल करणा-या नवजातपिढीला आई-बाबा कुठे ठाऊक असणार !!! आई आणि मम्मी यात किती फरक आहे. मराठी संस्कृतीचे महत्व पटवून सांगणारी आई, ग, म, भ, न ऐवजी ज्या घरात मम्मीचा उदय झाला; त्या घरातून A B C D यांची जीवघेणी स्पर्धा अस्तित्वात आली. मातृभाषेला रामराम करून इंग्लिशचा बाऊ करणारी समाजप्रवृती आपल्याकडे फोफावत चालली आहे. बाळाला टिळा लावून औक्षण करून "औक्षवंत हो" म्हणून शुभेच्छा देण्याऐवजी "हँप्पी बर्थ डे" च्या स्वरात मेणबत्या फुंकून, केक कापून परकीय संस्कृती, चालीरिती जोपासण्यास धन्यता मानली जात आहे. हात जोडून आदराने समोरील भेटणा-या व्यव-तीला नमस्कार करणे सोडून शेक हँण्ड नी जागा घेतली. तिथी पाहून सांस्कृतिक घडामोडी करणारे इंग्लिश तारखा पाहून व्यवहार करीत आहेत. आपल्या नावात मराठी अद्याक्षरांऐवजी इंग्लिश इनिशियल्सनी आपली जागा पव-की केली आहे.

          महाराष्ट्र ही थोरांची, संतांची, समाजसुधारकांची व दूरदृष्टी ठेवून जनकल्याण साधणा-या महापूरूषांची भूमी आहे. विश्वातील विविध जाती, धर्म, पंथ व संप्रदायाच्या लोकांना सामावून गुण्यागोविंदाने एकत्र राहणारे लोकही महाराष्ट्रातच आहेत. हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या कर्तृत्व व शौर्याने पावन झालेली ही भूमी होय.

          महाराष्ट्राच्या हितासाठी मराठी भाषिक धोरणाची अंमलबजावणी सर्व स्तरावर झाल्यास मराठी भाषा ही जगातील सक्षम भाषा बनेल. कुठल्याही समाजाची जडणघडण करण्याच्या दृष्टीने शिक्षण प्रकिया ही केंद्रस्थानी मानली जाते. सध्यस्थितीत शाळांमधून मराठी भाषेचे उच्चाटन होऊ लागले आहे. मातृभाषेचे शिक्षण घेण्याची संख्या कमी होत असून; महाराष्ट्रातील उच्च शिक्षणांमध्ये { विज्ञान, तंत्रज्ञान, आणि व्यवसाय } मराठी भाषेचा वापर होत नाही. शिक्षण प्रवेश प्रक्रिया व फि आकारणी यावर शिक्षणसंस्था विद्यार्थी यांचे हित पहात नसल्यामुळे, गरिब गरजू विद्यार्थी आशाळभूत पालक आपल्या शिक्षणावर पाणी सोडतात. तर काही जण नशिबाला दोष देत घरी बसतात.. ज्याची आर्थिक परिस्थिती चांगली तोच शिक्षण घेऊ शकतो. यासाठी सार्वत्रिक कर्ज योजना बँकांनी शिक्षणासाठी देणे आवश्यक आहे.

  उच्च शिक्षण प्रवेशाचा गोंधळ पहाता असे वाटते की, आपल्या शासनाला धनिकाचे भले व गरीबांचे वाटोळे करायचे ठरविले आहे काय? तळागाळा पर्यत शिक्षण पोहोचावे असे म्हणत प्रत्यक्षात धनिक बाळे तेवढीच शिक्षण घेतील असे वागणे कितपत योग्य? आपल्या मर्जीतल्या शिक्षण संस्थेला [ आमदार- खासदार, मंत्री यांच्या ] सरकारी जमीनी कमी भावात देणार. अन्य सुखसोई देणार, मात्र हेच नंतर जनतेला लुबाडणार. यांच्या दिलेल्या जागा  व मान्यता काढून घेणे हिताचे ठरेल. प्रत्येक व्यवहाराची चौकशी करून;  यांना पण सरकारी नोकर समजून ६०-६५ वयानंतर रिटायर्ड करावे. घोटाळ्यात अडकलेल्यांचे पेन्शन भते बंद करावेत. स्वत:चे वाढीव भत्ते फोन वगैरे या करता हे सगळे एक होतात यांना हा दणका हवाच. जेव्हा प्रवेश परीक्षा किंवा अमुकपदासाठी ही परीक्षा असे झाले तेव्हा तिथे भ्रष्टाचार आला. दरवेळेस अभ्यासक्रमाचे पँटर्न बदलून सा-या शिक्षणाचा खेळखंडोबा केला जातो. बरे ISI वगैरे होऊन भ्रष्टाचार  बंद झाला आहे का? यात खरे टँलेन्ट पुढे येतच नाही. म्हणूनच हजारो फीचे नाना त-हेचे व-लासेस निर्माण होतात व प्रत्येक   व-लास आमचेच विद्यार्थी पहिले येतात असे जाहीर करतात.

       मराठी भाषेचे वैभव जपण्यासाठी व भाषेच्या संवर्धनासाठी इंग्रजी नववर्षाच्या सुरूवातीलाच मराठी भाषा संवर्धन पंधरवडा साजरा करण्याचे आवाहन शासनाला करावे लागते. एकविसाव्या प्रगतीशील शर्यतीच्या युगामध्ये आपणा सर्वाना महाराष्ट्राच्या सुसंस्कृत परपरांचा विसर पडत चालला आहे. ३१ डिसेंबर साजरा करण्याच्या नादात आपण मराठी नुतन वर्षाचा पहिला दिवस " गुढीपाडवा " मात्र विसरत चाललो आहोत. या पवित्र सणाचे महात्म्य जपण्याचे सोडून पाश्यात्य संस्कृती अंगवळणी करून घेतल्यामुळे मराठी भाषेविषयीचा अभिमान, मराठीची महती व्यव-त करण्यासाठी पंधरवढा साजरा करण्याचे आवाहन करावे लागते. ही नव-कीच लाजिरवाणी बाब म्हणावी लागेल.

      " लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी

         जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी

       धर्म, पंथ, जात, एक जाणतो मराठी

       एवढ्या जगात माय मानतो मराठी "

कवी श्रेष्ठ कुसुमाग्रज तथा वि.वा.शिरवाडकर यांचा २७ फेब्रुवारी हा जन्मदिवस मराठी भाषा म्हणून दरवर्षी साजरा करण्यात येतो. किती मराठी शासकीय/अशासकीय अधिकारी-कर्मचारी राज्यकर्ते, भुमिपूत्र, महाराष्ट्रातील सामान्य जनता मराठी मायबोलीचा वापर करते. आपली स्वाक्षरी मराठीतून करते? वैभवशाली मराठी भाषा टिकवण्यासाठी ह्याक्षणापासून मराठी बांधवानी निदान आपली स्वाक्षरी मराठीतून करून आपले मराठीपण जपले तरी मराठी भाषा संवर्धन साठीचे आपल्यातर्फे पहिले पाऊल ठरेल.आणि कोणाचीही हिंमत होणार नाही की मराठी भाषेला

सापत्नपणाची वागणूक देण्याची.

                  -:- सुनिल गोपाळ पांचाळ -:-


Batmikar
संपादक - अभिषेक शिंदे