भाच्याने केली मित्राच्या मदतीने आत्याची हत्या !!

भाच्याने केली मित्राच्या मदतीने आत्याची हत्या !!

 प्रतिनिधी वसई : आत्या ओरडल्याने संतापून अल्पवयीन भाच्याने मित्राच्या मदतीने हत्या केल्याची घटना वसई उमेळमान येथे घडली आहे. त्यामुळे सगळीकडे खळबळ उडाली आहे. याप्रकरणी माणिकपूर पोलिसांनी अल्पवयीन भाच्यासह त्याच्या मित्राला अटक करून पुढील तपास सुरू केला आहे. अशी माहिती देण्यात आली आहे.

     मयत महिला दुर्गा बनसोडे वय वर्ष ६५ ही वसईच्या बरामपुर गावातील भिमाई बंगल्यात राहत होत्या तिची विवाहित मुलगी बोईसर, तर मुलगा वालीव येथे राहत असल्याने बनसोडे एकट्याच बंगल्यात राहत होत्या. सोमवारी सकाळी त्यांचा मृतदेह बंगल्यात आढळून आला.

       याप्रकरणी माणिकपूर पोलिसांनी तपास सुरू केला. बनसोडे वर्ष यांचा १५ वर्षाचा भाचा अधून मधून त्यांना भेटायला येत असल्याचे उघड झाले. 

      रविवारी भाचा सकाळी आत्याला भेटायला आला होता. शिल्लक कारणावरून आत्या त्याला ओरडली होती. म्हणून त्याला राग आला होता त्याने आपल्या मित्राला बोलावून घेतले, आजूबाजूला आवाज असताना पाठीमागून त्याने बांबूने तिच्या डोक्यावर वार केले. त्यात बनसोडे यांचा जागीच मृत्यू झाला. दोघांनी तिचा मुहूर्त देह बेडमध्ये टाकण्याचा प्रयत्न केला होता. मात्र ते त्यांना जमले नाही आणि दोघेजण फरार झाले.

       आरोपी अल्पवयीन आहेत भाचा व त्याचा मित्र दोघांना पोलिसांनी ताब्यात घेतले असता आपणच हत्या केल्याचे त्यांनी कबूल केले आहे.

   वसई पोलिसांनी मोठ्या शिताफीने आरोपींना अटक केली त्याबाबत स्थानिकांनी पोलिसांचे आभार मानलेले आहेत.


Batmikar
वार्ताहर - प्रीती तिवारी