२४ तासाच्या आत १५ वर्षीय मुलाला शोधून केला पालकांच्या स्वाधीन !!

२४ तासाच्या आत १५ वर्षीय मुलाला शोधून केला पालकांच्या स्वाधीन !!

   मुंबई पंतनगर आणि उत्तरप्रदेश अलिगढ पोलिसांची दमदार कामगिरी २४ तासाच्या आत १५ वर्षीय मुलाला शोधून केला पालकांच्या स्वाधीन !!


     कीर्ती महाविद्यालयात ११ वीत शिकणारा मुलगा निखिल अनिल पवार घरी न सांगता कोणताही वाद न करता ऑनलाईन गेम च्या जाळ्यात अडकून कॉलेजला जातो असे सांगून कोठेतरी निघून गेला अशी माहिती घरच्यांना मिळाली त्यावेळी घरातील व्यक्तींनी प्रथम पंतनगर पोलीस ठाणे घाटकोपर येथे तक्रार करताच पोलिसांनी अवघ्या १२ तासाच्या आत आपली पोलिसी यंत्रणा राबवत अलिगढ उत्तरप्रदेश येथे अलिगढ रेल्वे स्थानक येथे पकडला.

       कर्तव्यावर असणारे घाटकोपर पंतनगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सौ. लता सुतार, पोलीस उपनिरीक्षक श्री. सुभाष हामरे, हरवलेले व्यक्ती शोध पथक, पोलीस निरीक्षक श्री. चंदू गाडे, सहाय्यक पोलीस निरीक्षक श्री. डी.एस.जाधव, श्री. संदेश गवाळे, पोलीस शिपाई, पंतनगर पोलीस ठाणे येथील सर्व कर्तव्यदक्ष अधिकारी तसेच अलिगढ उत्तरप्रदेश पोलीस प्रभारी निरीक्षक श्री.संदीप तोयर, वरिष्ठ उपनिरीक्षक श्री. गौरव वर्मा, उपनिरीक्षक श्री. गजेंद्र सिंह, थाना जी.आर.पी. अलिगढ ज. उत्तरप्रदेश तसेच श्री. संतोष बाबाजी खरात पोलीस वाहतूक विभाग, सचिन पालवे सहाय्यक पोलीस निरीक्षक वरळी पोलीस ठाणे यांनी देखील यासाठी मदत केली.

    समाजातील सर्वच थरातून याबाबत पोलिसांचे कौतुक केले जात आहे. तसेच मुलाच्या घरचे नातेवाईक, मित्र परिवार यांनी पोलिसांनी सतर्क कामगिरी बजावली यासाठी मनापासून आभार व्यक्त केले.


Batmikar
संपादक - अभिषेक शिंदे