घरफोडी करणाऱ्या महिला आरोपीस अटक, गुन्हे प्रकटीकरण शाखा, कक्ष–1 यांची उल्लेखनीय कामगिरी !!

घरफोडी करणाऱ्या महिला आरोपीस अटक, गुन्हे प्रकटीकरण शाखा, कक्ष–1 यांची उल्लेखनीय कामगिरी !!

घरफोडी करणाऱ्या महिला आरोपीस अटक, गुन्हे प्रकटीकरण शाखा, कक्ष 1 यांची उल्लेखनीय कामगिरी !!


       दिनांक 15/01/2026 रोजी काशिमिरा पोलीस ठाणे हद्दीत लोढा अॅक्वा बिल्डिंग, पेणकरपाडा, मिरारोड पूर्व येथे घरफोडीचा प्रकार घडला होता.

       फिर्यादी हे घर लॉक करून मतदानासाठी बाहेर गेल्या असताना अज्ञात आरोपीने घरात प्रवेश करून बेडरूममधील लाकडी कपाटाचे लॉकर तोडून 7,08,000/- रुपये किंमतीचे सुमारे 13 तोळे सोन्याचे दागिने चोरी केल्याची तक्रार दाखल केली होती.

     या प्रकरणी काशिमिरा पोलीस ठाणे येथे गुन्हा दाखल करण्यात आला होता. सदर गुन्ह्याचा समांतर तपास गुन्हे प्रकटीकरण शाखा, कक्ष 1 यांनी करून तांत्रिक तपास व गोपनीय माहितीच्या आधारे महिला आरोपीस ताब्यात घेऊन चौकशी केली असता तिने गुन्हा केल्याचे निष्पन्न झाले. आरोपीकडून 7,08,000/- रुपये किंमतीचे सुमारे 13 तोळे सोन्याचे दागिने हस्तगत करण्यात आले आहेत.

     या कामगिरी बाबत काशिमिरा पोलीस ठाण्याचे समाज माध्यमातून कौतुक केले जात आहे.


Batmikar
संपादक - अभिषेक शिंदे