भिवंडी पोलिसांनी ७,३९,४००/- रू. किमतीचे सोने चांदीचे दागिने हस्तगत करून घरफोडी व वाहन चोरीचे असे एकूण ६ गुन्हे केले उघड !!
भिवंडी पोलिसांनी ७,३९,४००/- रू. किमतीचे सोने चांदीचे दागिने हस्तगत करून घरफोडी व वाहन चोरीचे असे एकूण ६ गुन्हे केले उघड !!
भिवंडी पोलिसांनी ७,३९,४००/- रू. किमतीचे सोने चांदीचे दागिने हस्तगत करून घरफोडी व वाहन चोरीचे असे एकूण ६ गुन्हे केले उघड !!
गुन्हे शाखा घटक २, भिवंडी पोलिसांची कामगिरी !!
ठाणे पोलीस आयुक्तालयात घरफोडी चोरीच्या होणाऱ्या घटनांना आळा बसवण्यासाठी, वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी सुचना दिलेल्या होत्या, त्याप्रमाणे गुन्हे शाखेकडून चोरीच्या प्रकरणांना आळा घालण्यासाठी उपाययोजना चालु असतानाच सदर गुन्हे उघड करण्यात गुन्हे शाखा, घटक - २, भिवंडी येथील अधिकारी व अंमलदार यांना यश प्राप्त झाले आहे.
मिळालेल्या गुप्त बातमीदाराच्या व तांत्रिक विश्लेषणाचे आधारे गुन्हे शाखा, घटक २, भिवंडी येथील पथकाने सराईत गुन्हेगार आरोपी (१) आजाद सिंग उर्फ धनरी मधुसिंग टाक, वय ३३ वर्षे (२) अजय सिंग उर्फ मामू भूरासिंग दुधानी, वय २८ वर्षे, दोघे राहणारे दिंडोली, सुरत, राज्य गुजरात यांना शिताफीने ताब्यात घेतले. आरोपीकडे कौशल्यपूर्ण तपास करून आरोपीकडुन एकुण ७,३९,४००/- रू. किमतीचे सोने चांदीचे दागिने हस्तगत करून खालीलप्रमाणे घरफोडी व वाहन चोरीचे एकूण ६ गुन्हे उघड केले आहेत.
दाखल असलेले गुन्हे पुढील प्रमाणे !!
१) नारपोली पो. ठा. गुन्हा रजि. नं. ७४/२०२६, भा.न्या.सं.क. ३०७ (अ), ३३१ (३), ३३१ (४),
२) नारपोली पो. ठा. गुन्हा रजि. नं. ३३/२०२६, भा.न्या.सं.क. ३०७, ३३१ (३), ३ (७),
३) नारपोली पो. ठा. गुन्हा रजि. नं. २४/२०२६, भा.न्या.सं.क. ३०७ (ए), ३३१ (३), ३३१ (४),
४) नारपोली पो. ठा. गुन्हा रजि. नं. १३३७/२०२७, भा.न्या.सं.क. ३३१ (४), ३३१ (३), ३०५ (ए),
५) कोनगाव पो. ठा. गुन्हा रजि. नं. ७७७/२०२७, भा.न्या.सं.क. ३०७, ३३१ (३), ३३१ (४),
६) विरार पो. ठा. गुन्हा रजि. नं. २३/२०२३, भा.न्या.सं.क. ३०३ (२)
वरील कामगिरी ही मा. डॉ. पंजाबराव उगले - अपर पोलीस आयुक्त गुन्हे ठाणे, मा. अमरसिंह जाधव - पोलीस उप आयुक्त गुन्हे ठाणे व मा. शेखर बागडे - सहाय्यक पोलीस आयुक्त गुन्हे शोध १ ठाणे यांच्या मार्गदर्शनाखाली..
गुन्हे शाखा, घटक २ भिवंडीचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री. शितल राऊत, सहाय्यक पोलीस निरीक्षक श्रीराज माळी, मिथुन भोईर, पोलीस उपनिरीक्षक रविंद्र वी. पाटील, राजेश शिंदे, रामचंद्र जाधव, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक सुधाकर चौधरी, सुनिल साळुंखे, पोलीस हवालदार निलेश बोरसे, प्रशांत राणे, प्रकाश पाटील, सुदेश घाग, शशिकांत यादव, साबिर शेख, राजेश गावडे, वसंत चौरे, रंगनाथ पाटील, वामन भोईर, किशोर थोरात, पोलीस नाईक योगेश कवडे, पोलीस शिपाई अमोल इंगळे, सर्फराज तडवी, विजय कुंभार, भावेश घरत, रविंद्र साळुंखे व महिला पोलीस हवालदार माया डोंगरे, अनुष्का पाटील, दक्षता सुतार, सायली गंभेरा यांनी केली आहे.
याबाबत भिवंडी विभागात भिवंडी पोलिसांचे व गुन्हे शाखेचे समाज माध्यमातून कौतुक केले जात आहे.