मुंबई पोलिसांनी केले तक्रार निवारण दिनाचे आयोजन !!
मुंबई पोलिसांनी केले तक्रार निवारण दिनाचे आयोजन !!
मुंबई पोलिसांनी केले तक्रार निवारण दिनाचे आयोजन !!
मा. पोलीस आयुक्त, बृहन्मुंबई यांच्या आदेशान्वये व मा. पोलीस सह आयुक्त (का. व सु.), मुंबई यांच्या देखरेखीखाली बृहन्मुंबई पोलीस आयुक्तालय अंतर्गत सर्व पोलीस ठाण्यांमध्ये दर शनिवारी तक्रार निवारण दिनाचे आयोजन करण्यात येते. दिनांक २८/०२/२०२६ रोजी सर्व पोलीस ठाण्यांमध्ये महिला व जेष्ठ नागरीक यांच्याकरीता तक्रार निवारण दिनाचे आयोजन करण्यात आले होते.
सदर आयोजित तक्रार निवारण दिनाच्यावेळी पोलीस ठाण्यात दाखल दखलपात्र व अदखलपात्र गुन्हयातील फिर्यादी तसेच तक्रार अर्जामधील अर्जदार असे एकूण ८३७ तक्रारदार हजर होते. त्यापैकी ३८५ महिला तक्रारदार व १४३ जेष्ठ नागरीक हजर होते. पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक व इतर अधिकारी यांच्याकडून त्यांच्या तक्रारीचे निरसन करण्यात आले. सदरवेळी विभागीय सहाय्यक पोलीस आयुक्त हे हजर होते. तसेच प्रादेशिक विभागांचे अपर पोलीस आयुक्त व परिमंडळीय पोलीस उप आयुक्त यांनी भेटी देवून मार्गदर्शन केले.