काव्यसंग्रह प्रकाशनाला उत्स्फूर्त प्रतिसाद !!

काव्यसंग्रह प्रकाशनाला उत्स्फूर्त प्रतिसाद !!

         श्री. माणिक मुंडे संपादित आणि गंगाबाई मुंडे रचित ‘गाईन ओवी गाईन नाम’ या काव्यसंग्राचे प्रकाशन माजी मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदे यांच्या हस्ते नुकतेच सीएसटी येथील मुंबई मराठी पत्रकार संघात  झाले. या समारंभाच्या अध्यक्षस्थानी त्रिपुराचे माजी राज्यपाल डॉ. डी. वाय. पाटील होते. तसेच मंचावर मुंबईचे माजी नगरपाल डॉ. जगन्नाथराव हेगडे आणि डॉ. निलेश पावसकर उपस्थित होते. ‘शिवनेर’ प्रकाशनने हे पुस्तक प्रकाशित केले असून सुशीलकुमार शिंदे यांनी प्रारंभीच शिवनेरकार विश्वनाथराव वाबळेंचा आवर्जून उल्लेख केला. तसेच या काव्य संग्राहकचे प्रकाशन त्यांच्या हस्ते करून त्यांनी या संग्रहाला योग्यच न्याय दिला असल्याची भावना मुंबई मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष नरेंद्र वाबळे यांनी या समारंभात व्यक्त केली. या समारंभात मुंबई मराठी पत्रकार संघाचे सदस्य आणि पत्रकार मंडळी मोठ्या संख्येने उपस्थित होती.


Batmikar
मुंबई प्रतिनिधी - केतन खेडेकर

Most Popular News of this Week