गिरगाव चौपाटी येथे लोकमान्य टिळक जयंती साजरी !!

गिरगाव चौपाटी येथे लोकमान्य टिळक जयंती साजरी !!

          कोरोनाची बंधने असुनही आज लोकमान्य टिळकांचा जयंती समारंभ उत्तम प्रकारे पार पडला. कोणताही राजकिय अभिनिवेश नसलेला, एखादा घरगुती समारंभ असल्यासारखा प्रत्येकाने या कार्यक्रमात सहभाग घेतला होता. ध्वजारोहणानंतर राष्ट्रगीत झाले. त्यानंतर सतीश भिडे यांच्या गायक गटातील शेखर मस्तकार यांनी लोकमान्य टिळकांवर स्वरचित दमदार पोवाडा गायला. उपस्थितांनी उत्स्फुर्त दाद दिली. ध्वजारोहण महापालिकेचे विभागिय सुरक्षा अधिकारी सुशिल बडेकर यांच्या हस्ते पार पडला.

     

 याप्रसंगी स्थानिक पोलिस निरीक्षक श्री. प्रदीप खुडे व पोलिस निरीक्षक (गुन्हे) श्री. राजा बिडकर यांनी राष्ट्रध्वजाला व लोकमान्य टिळकांना मानवंदना दिली. महानगरपालिकेतर्फे श्री. अहिरे, श्री. राहुल कोल्हे व त्यांचा कर्मचारी वर्ग या कार्यक्रमास अगत्याने उपस्थित होता. महापालिकेतर्फे फुलांची उत्तम सजावट व व्यवस्था करण्यात आली होती. स्वराज्यभूमी स्मारक समितीने नेहमीप्रमाणे या कार्यक्रमाचे आयोजन केले होते. समितीच्या सहसचिव श्रीमती उज्वला मेहेंदळे, श्री संतोष गाजुल (फोटोग्राफर), श्री. अविनाश जाधव, श्री. नितीन वाडकर, श्री. श्रीनिवास यांनी कार्यक्रमाच्या नियोजनात भाग घेतला. लोकल सुरु नसल्यामुळे अनेकांना या कार्यक्रमात भाग घेता आला नाही. असे प्रकाश सिलम, संस्थापक अध्यक्ष, लोकमान्य टिळक स्वराज्यभूमी स्मारक समिती यांनी सांगितले.


Batmikar
मुख्य वार्ताहर - रवींद्र भोजने

Most Popular News of this Week