सायन येथे केंद्र सरकारच्या महागाई विरोधात जोरदार आंदोलन !

सायन येथे केंद्र सरकारच्या महागाई विरोधात जोरदार आंदोलन !

        सायन कोळीवाडा विधानसभा काँग्रेस कमिटी तर्फे केंद्र सरकारने वाढवलेल्या महागाईच्या विरोधात सायन विभागात मुंबई काँग्रेस अध्यक्ष आमदार भाई जगताप यांच्या नेतृत्वाखाली जोरदार निदर्शने करण्यात आली. महागाई कमी करा नाही तर खुर्ची खाली करा, या सरकारचे करायचे काय खाली डोके वर पाय अशा विविध घोषणांनी परिसर दणाणून गेला.


     या निदर्शनांमध्ये दक्षिण मध्य मुंबई जिल्हाध्यक्ष हुकूमराज मेहता, मुंबई काँग्रेस वरिष्ठ उपाध्यक्ष गणेश यादव, कामगार नेते अनिल गणाचार्य,  राजु ठक्कर, मुंबई काँग्रेस सेक्रेटरी संदीप शुक्ला, ब्लॉक क्र 172 चे अध्यक्ष विनोद शिवकर, कॉंग्रेसचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि इतर मान्यवर मंडळी उपस्थित होते.


Batmikar
मुंबई प्रतिनिधी - केतन खेडेकर

Most Popular News of this Week