पेट्रोल, डिझेल, गॅस व जिवनावश्यक वस्तुंच्या भरमसाठ दरवाढी विरोधात भायखळ्यात जनआंदोलन !

पेट्रोल, डिझेल, गॅस व जिवनावश्यक वस्तुंच्या भरमसाठ दरवाढी विरोधात भायखळ्यात जनआंदोलन !

         अख‍िल भारतीय काँग्रेस कमिटीच्या निर्देशानुसार आज भायखळा विधानसभा मतदार संघातील ब्लॉक काँग्रेस कमिटी क्र. 208 च्या वतीने "पेट्रोल, डिझेल, गॅस व जिवनावश्यक वस्तुंच्या भरमसाठ दरवाढी विरोधात" मा.अध्यक्ष म्हाडा (मंत्री दर्जा) व मुंबई काँग्रेसचे वरिष्ठ उपाध्यक्ष मा.आमदार श्री.मधु अण्णा चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली घोडपदेव-फेरबंदर येथे जनआंदोलन करण्यात आले. मोदी सरकारने घरगुती गॅस, पेट्रोल व डिझेल व जिवनावश्यक वस्तुंच्या किंमती भरमसाठ वाढवल्याने महागाईचा भडका उडाला आहे. सर्वसामान्य जनतेने आता जगायचे कसे, असा प्रश्न पडला आहे. त्यामुळे केंद्रातील भाजप सरकारने तातडीने पेट्रोल, डिझेल, गॅस व जिवनावश्यक वस्तुंच्या किंमती कमी कराव्यात व सर्वसामान्य जनतेला दिलासा द्यावा अशी मागणी आंदोलनाद्वारे केलेली आहे. या आंदोलनात काँग्रेसचे ब्लॉक अध्यक्ष, युवानेते अनिकेत घाडीगांवकर, राजू घाडीगांवकर, ज्येष्ठ नेते भाऊसाहेब आंग्रे, समीर चव्हाण, मधु साळुंखे, संदिप कांडके, ॲङ वैभव म्हस्के व अन्य ज्येष्ठ काँग्रेस पदाध‍िकारी-कार्यकर्ते व विभागातील नागरिकांनी सहभाग घेतला. भायखळा काँग्रेसच्यावतीने सदर जनआंदोलन संपूर्ण भायखळा विधानसभा मतदार संघात 17 जुलै पर्यंत राबविण्यात येणार आहे.


Batmikar
मुंबई प्रतिनिधी - केतन खेडेकर

Most Popular News of this Week