परळ - लालबाग मध्ये मनसेचा अभिनव उपक्रम !

परळ - लालबाग मध्ये मनसेचा अभिनव उपक्रम !

    मनसे आरोग्य सेवा कार्ड वाटप......

   सद्याच्या कोविड महामारीचे दुष्परिणाम सर्व क्षेत्रांवर झालेले आहेत. यामुळे कोरोना व्यतिरिक्त अन्य आजारांकरिता विविध चाचण्यांवरील होणारा भरमसाठ खर्च लोकांना परवडत नाही. अशा परिस्थितीत आपल्या प्रभागातील नागरिकांसाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेना शिवडी विधानसभा प्रभाग क्र.२०३ चे शाखाध्यक्ष निलेश इंदप यांच्या संकल्पनेतून प्रभागातील नामलौकिक Diagnostic Centers यांच्या सहकार्याने ५०% विशेष सवलतीच्या दरात वर्षभरासाठी लालबाग - परळ मधील ५०० नागरिकांना आणि त्यांच्या कुटुंबियांना रक्ततपासणी  विशेषत: ज्या कुटुंबातील वयोमानाने आजारांनी त्रस्त असलेली व्यक्ती बाहेर जाऊ शकत नाही, ज्यांना आजारपणाने चालता येत नसेल अशा नागरिकांसाठी मनसे शाखा क्र.२०३ तर्फे घरोघरी जाऊन ही सेवा देण्यात येत आहे.    

    सोनोग्राफी, एम.आर.आय, सिटीस्कॅन, २ डी इको इत्यादी बऱ्याच चाचण्या करणारे मनसे आरोग्य सेवा कार्ड माजी गृहराज्यमंत्री तसेच मनसे नेते बाळा नांदगावकर यांच्या हस्ते या सेवा कार्ड वाटपाचा शुभारंभ परेल येथील भावसार सभागृह येथे नुकताच करण्यात आला.

    याप्रसंगी मनसेनेते बाळा नांदगांवकर यांच्यासोबत मनसेचे महाराष्ट्र उपाध्यक्ष संजय जामदार, बंटी म्हशीलकर, शिवडी विधानसभेचे विभाग अध्यक्ष नंदकुमार चिले, शाखाध्यक्ष निलेश इंदप, डाॅ. प्रागजी वाजा, डाॅ.अनिल आव्हाड आदी मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते.

      या मनसे आरोग्य सेवा कार्डचे वाटप शाखाअध्यक्ष निलेश इंदप हे आपल्या महाराष्ट्र सैनिकांसह नागरिकांच्या घरोघरी जाऊन करीत आहेत.


Batmikar
मुंबई प्रतिनिधी - केतन खेडेकर

Most Popular News of this Week