
डॉ. जगन्नाथराव हेगडे यांच्या पुढाकाराने ज्येष्ठ नागरिक आणि महिलांना छत्र्या वाटप !
डॉ. जगन्नाथराव हेगडे यांच्या पुढाकाराने ज्येष्ठ नागरिक आणि महिलांना छत्र्या वाटप !
माजी नगरपाल डॉ. जगन्नाथराव हेगडे यांच्या पुढाकाराने ज्येष्ठ नागरिक तसेच महिलांना काळाचौकी येथे छत्र्या वाटपाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला.
लायन्स क्ल्ब ऑफ मिडटाऊनचे या कामी सहकार्य मिळाले. कार्यक्रमास लायन्स क्लबचे डिस्ट्रिक्ट गव्हर्नर लायन सर्वश्री प्रसाद पानवलकर, फर्स्ट व्हाईस गव्हर्नर संजय चुरी, माजी डिस्ट्रिक्ट गव्हर्नर राजकुमार गुप्ता, लायन डॉ. राहुल हेगडे, लायन डॉ.वर्षा राठोड, लायन्स क्लब ऑफ मिडटाऊनचे प्रेसिडेंट लायन विजय रायमाने, सेक्रेटरी लायन उदय पवार, लायन सुभाष भोसले, लायन विलास डांगे, डाॅ.प्रागजी वाजा आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते.
वरिष्ठ नागरिकांची सेवा करणे तसेच महिलांना सन्मान देणे हे सुदृढ समाजाचे लक्षण आहे. त्यामुळे समाजाच्या विकासात भर पडते, असे विचार माजी नगरपाल आणि लायन्स क्लबचे सेकंड व्हाईस डिस्ट्रिक्ट गव्हर्नर तसेच या कार्यक्रमाचे आयोजक डॉ. जगन्नाथराव हेगडे यांनी व्यक्त केले.
सदर कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सर्वश्री लायन राजेंद्र साळसकर, लायन नितिन कोलगे, लायन दिलिप वरेरकर, संजय कुलकर्णी, विकास येवले, लायन राजेश कांबळे, लायन अशोक पवार, दिपक घाडीगावकर, संतोष चौगुले आदींनी विशेष परिश्रम घेतले.