मराठा आरक्षणासाठी रविवारी मुंबईत बाईक रॅलीचे आयोजन !!

मराठा आरक्षणासाठी रविवारी मुंबईत बाईक रॅलीचे आयोजन !!

          महाविकास आघाडी सरकारने मराठा आरक्षणाचा प्रश्न तात्काळ निकाली काढावा अशी मागणी करीत येत्या रविवारी मुंबई बाईक रॅलीचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती मराठा क्रांती ठोक मोर्चाचे समन्वयक श्री. राजन घाग यांनी दिली.

            मराठा क्रांती मोर्चा नेते राजन घाग यांनी पत्रकार परिषदेचे आयोजन केले होते, सायन सोमय्या मैदान येथून बाईक रॅलीला सुरुवात होणार आहे, सदरच्या बाईक रॅलीचे नेतृत्व शिवनेरी किल्ल्यावरून शिवज्योत येणार आहे ते बाईक रॅली च्या पुढील अग्रभागी असतील बाईक रॅली मध्ये मुंबई पुणे ठाणे नाशिक येथून साधारणता 2000 ते 2500 बाईक, एक मोटारसायकल असतील महाराष्ट्रातील आमदार नगरसेवक खासदार यांचा मराठा आरक्षणाला सक्रीय पाठिंबा आहे असे सर्व नेते रॅलीमध्ये उपस्थित राहणार आहेत.

        पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नावर उत्तर देताना श्री. राजन घाग असे म्हणाले की मराठा आरक्षण संदर्भात महाराष्ट्रात आता विविध ठिकाणी विविध नेते वेगवेगळ्या प्रकारे आंदोलन करणार आहेत आमचे आंदोलन हा एक दबावतंत्राचा कार्यभाग आहे. मराठा आरक्षण हे सुप्रीम कोर्ट मध्ये सरकारला पुन्हा पिटीशन फाईल करावा लागेल, गायकवाड आयोगाच्या शिफारसी कोर्टाने स्वीकारल्या पाहिजेत आयोगाची स्थापना करून राज्यपालां मार्फत अहवाल केंद्राला गेला पाहिजे हे सर्व आंम्हाला मान्य असताना सुद्धा सरकारने आपापल्या परीने प्रयत्न करावेत मराठा क्रांती मोर्चा व मराठा आरक्षणाला समर्थन देणारे इतर नेते, समित्या हे आरक्षण मिळवण्यासाठी आपापल्यापरीने आंदोलन करणार आहेत

       खासदार संभाजीराजे हे महाराष्ट्र सरकारची वारंवार बोलणी करीत आहेत परंतु त्या बोलणे मध्ये कुठल्याही प्रकारे यश मिळणार नाही याची शंभर टक्के हमी आंम्हाला आहे कारण अशाच प्रकारची बोलणी आम्ही सरकारशी वारंवार केली होती म्हणून सरकारशी बोलणी करून आंम्हाला आरक्षण मिळणार नाही आंम्हाला आरक्षणासाठी रस्त्यावर उतरावं लागेल दबावतंत्राचा वापर करावा लागेल तरच आम्हाला आरक्षण मिळेल.

        आमची बाईक रॅली सायन दादर माटुंगा जेजे ब्रिज वरून विटी रेल्वे स्टेशन येथे शिव प्रतिमेचे पूजन करून बाईक रॅलीची सांगता केली जाईल अशी  माहिती  राजन घाग यांनी दिली.


Batmikar
मुख्य वार्ताहर - रवींद्र भोजने

Most Popular News of this Week