कॉ. विजय गणाचार्य यांचे दुःखद निधन !

कॉ. विजय गणाचार्य यांचे दुःखद निधन !

        कॉ.विजय गणाचार्य यांचे वृद्ध काळातील आजारपणामुळे व कोरोनामुळे निधन झाले. कम्युनिस्ट नेते कॉ. गुलाबराव गणाचार्य त्यांचे वडील. विजय गणाचार्य तरूणपणीच गिरणी कामगारांच्या चळवळीशी जोडले गेले. ऑल ईन्डिया यूथ फेडरेशनचे पदाधिकारी, हॉटेल कामगार युनियनची मुंबईत बांधणी, जनरल कामगार युनियन, जनरल ईन्शुरन्स एम्प्लॉईज असोसिएशनचे नेते, वृद्धकाळात जेष्ट नागरिकांच्या समस्या हातात घेऊन त्यांची संघटना बांधली, नेहरू नगर नागरिक मंडळाचे अध्यक्ष, भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे साप्ताहिक 'युगांतर' ह्याच्या संपादक पदाचीही जबाबदारी काही काळ घेतली, माजी भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्या मुंबई सचिव मंडळाचे व महाराष्ट्र कौन्सिलचे सदस्य.

       अशा ह्या सहकाऱ्याला क्रांतिकारी लाल सलामी व भावपूर्ण श्रद्धांजली देऊन त्यांच्या कुटुंबियांच्या दुख:त बंदर व गोदी कामगार सहभागी आहेत.


Batmikar
मुख्य वार्ताहर - रवींद्र भोजने

Most Popular News of this Week