
भायखळ्यात बचत गट महिलांना शिवसेनेने दिले, फूड ट्र्क !!
भायखळ्यात बचत गट महिलांना शिवसेनेने दिले, फूड ट्र्क !!
शिवसेनेच्या ५५ व्या वर्धापनदिनाचे औचित्य साधून भायखळा विधानसभा मतदारसंघातील ५५ महिला बचत गटातील महिलांना स्वयंरोजगाराची संधी उपलब्ध करून देणाऱ्या ‘फूड ट्रक’ ह्या संकल्पनेचा शुभारंभ खासदार अरविंद सावंत यांच्या उपस्थितीत करण्यात आला. डॉकयार्ड रोड येथील एकनाथ बांदल मैदानात झालेल्या या सोहळ्याला, स्थायी समिती अध्यक्ष यशवंत जाधव आणि आमदार यामिनी जाधव यावेळी उपस्थित होते.
शिवसेना उपनेते यशवंत जाधव व आमदार यामिनी यशवंत जाधव यांच्या संकल्पनेतून हा उपक्रम सुरु करण्यात आला आहे. या उपक्रमामुळे मतदारसंघातील महिलांना आपल्याकडील विविध वस्तू, किराणा सामान, भाजीपाला, चहा, नाश्ता, जेवण आदी विविध व्यवसायासाठी स्वतःच्या हक्काची जागा उपलब्ध होणार आहे. खा. अरविंद सावंत यांनी या अभिनव उपक्रमाचे मुक्तकंठाने कौतुक केले आणि लाभार्थी बचत गटांना शुभेच्छा दिल्या. आ. यामिनी जाधव यांनीही विचार मांडले. जनतेच्या प्रत्येक सुखदुःखात शिवसेना सोबत असते. भायखळा विधानसभा मतदारसंघात जनतेच्या हिताचे अनेक उपक्रम राबविण्यात आले आहेत. जनतेने त्यांचा लाभ घ्यावा, असे आवाहन त्यांनी केले.
या प्रसंगी विधानसभा समन्वयक बबन गावकर, विधानसभा संघटक विजय (दाऊ) लिपारे, उपविभागप्रमुख राम सावंत, विजय कामतेकर, सिनेट सदस्य निखिल जाधव, शाखाप्रमुख हेमंत कदम, रमेश रावल, निंगाप्पा चलवादी, विनोद शिर्के, महिला शाखा संघटक प्रज्ञा राणे, संगिता मारणे, अश्विनी खटावकर, सोनल सायगांवकर, ग्राहक कक्षाचे देवीदास माड्ये, युवासेनेचे स्वप्नील बागवे, श्रध्दा वाघमारे, वाहतूक सेनेचे फारुक काझी तसेच भायखळा विधानसभेतील शिवसैनिक, युवासैनिक, पदाधिकारी, महिला आघाडी व बचत गटातील महिला मोठ्या प्रमाणावर उपस्थित होते.