
शालेय, महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना शिवसेनेने केले छत्री वाटप !!
शालेय, महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना शिवसेनेने केले छत्री वाटप !!
पर्यटन, राजशिष्टाचार मंत्री, शिवसेना नेते आदित्य ठाकरे" यांच्या वाढदिवसानिमित्त वरळी विधानसभेतील शालेय व महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना मोफत छत्री वाटप करण्यात आले. यावेळी माजी आमदार सुनीलजी शिंदे, कामगार नेते निशिकांत शिंदे, शिवसेना शाखा क्रमांक १९८ चे शाखाप्रमुख श्री. दिपक बागवे, वैद्यकीय अधिकारी, मुंबई महानगरपालिका डॉ. रोहन रोहेकर यांच्या प्रमुख उपस्थितीत हा कार्यक्रम संपन्न झाला. या कार्यक्रमात शालेय आणि महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनी शिवसेनेचे मनापासून आभार मानले. यावेळी युवासेना उपसचिव सिद्धेशजी शिंदे, संदिपजी वरखडे, शिवसेना विधानसभा सोशल मिडिया समन्वयक श्री. शैलेशजी सिंह, कॉलेज कक्ष स. सदस्य दिपेश जांभळे, युवा विभाग अधिकारी संकेत सावंत, युवती विभाग अधिकारी सौ. आकर्षिका बेकल-पाटील, युवासेना उपविभाग अधिकारी श्री. अभिजित पाटील, युवती विधानसभा चिटणीस योगिनी सावंत, युवासेना शाखा अधिकारी नितीन शिरोडकर, विनायक भोले, योगेश पवार, युवती शाखा अधिकारी स्नेहल देशमुख,युवा शाखाचिटणीस रुपेश घाग, युवासेना सोशल मीडिया शाखा समन्वयक प्रभात यादव, लाला लजपतराय महाविद्यालय युवासेना युनिट मा. अध्यक्ष सुरज भाकरे, शिवसेना - युवासेना पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.