
तर पत्रकार शासनाविरोधात आंदोलन करतील......
पत्रकारांना केंद्राकडून आर्थिक पॅकेज मिळण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे मागणी करणार रामदास आठवले यांचे प्रतिपादन लोकडॉन मुळे पत्रकारांच्या नोकऱ्या संपुष्टात आल्या असून अनेक पत्रकार अर्ध्या पगारावर काम करत आहेत. पत्रकारांना केंद्राकडून आर्थिक पॅकेज तसेच मदत मिळण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना भेटून त्यांच्याकडे मागणी करणार असल्याची माहिती भारत सरकारचे केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी मुंबई मराठी पत्रकार संघात आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात दिली. मुंबई मराठी पत्रकार संघ येथे पत्रकारांना माजी खासदार रामशेठ ठाकूर यांच्या वाढदिवसानिमित्त मोफत अन्न धान्य वाटप आठवले यांच्या हस्ते करण्यात आले. ते पुढे म्हणाले कोरोनामुळे अनेक पत्रकारांचा मृत्यू झाला असून त्या पत्रकार यांना अजून मदत देखील मिळाली नाही. तसेच पत्रकारांना 50 लाखाचा विमा काढण्याबाबत मी शासनाकडे मागणी केली असून तो विमा देखील मिळाला नसल्याने त्या ठिकाणी देखील मी सातत्याने प्रयत्न करत आहे. पत्रकार हा समाजाचा अविभाज्य घटक असून आणि स्तरावरील बातम्या जनतेपर्यंत पोहोचवण्याचे काम करत असतात. परंतु आज त्यांची परिस्थिती इतकी गंभीर झाली असून ती त्यांच्याकडे लक्ष द्यायला शासनाला वेळ नाही. तसेच पत्रकारांना फ्रॅंट लाईन दर्जा देखील देण्यात आला नसून याबाबत मी लवकरच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेऊन पत्रकारांना आर्थिक पॅकेज तसेच आणखी काही मदत कशा प्रकारे करता येईल याबाबत निवेदन देण्यात येईल अशी माहिती खासदार रामदास आठवले यांनी दिली. पत्रकारांना लोकल ट्रेन चा पास मिळत नसून त्यांना शासनाने कोणत्याही प्रकारची मदत केली नाही. मुंबई मराठी पत्रकार संघ हे महाराष्ट्र शासनाच्या विरोधात आंदोलन करणार होते परंतु मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मला आंदोलन करू नका तुमच्या सगळ्या मागण्या मान्य करतो अशी विनंती केल्यामुळे आम्ही आंदोलन स्थगित केले. परंतु आजूनदेखील आमच्या मागण्या मान्य झाल्या नसून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी त्यांचे आश्वासन पाळले नाही. त्यामुळे पत्रकार बांधव शासनावर तीव्र नाराज आहेत. कोरोनामुळे अनेक पत्रकार बेरोजगार झाले असून त्यांची परिस्थिती गंभीर त्यामुळे आम्ही आठवले साहेब तुम्हाला विनंती करतो की पत्रकारांना शासनाकडून कशा प्रकारे मदत करता येईल याबाबत आपण शासनाकडे आणि केंद्र सरकारकडे पाठपुरावा करावा अशी माहिती मुंबई मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष नरेंद्र वाबळे यांनी दिली. या समारंभात पत्रकार संघाचे कार्यवाह विष्णु सोनावणे, उपाध्यक्ष सुधाकर कश्यप, पत्रकार बांधव उपस्थित होते.