
मराठा समाजाचे ओबीसीकरण करा संभाजी ब्रिगेडची मागणी !!
मराठा समाजाचे ओबीसीकरण करा संभाजी ब्रिगेडची मागणी !!
मराठा समाजाला आरक्षण देऊन मराठा समाजाची ओबीसी करण करावे अशी मागणी बुधवारी मुंबई मराठी पत्रकार संघात झालेल्या पत्रकार परिषदेत संभाजी ब्रिगेड प्रदेश अध्यक्ष मनोज ठाकरे यांनी दिली. आरक्षणाचे जनक राजर्षी शाहू महाराज यांचा २६ जून हा जन्मदिवस आहे. २६ जून पर्यंत सर्व आमदार खासदार मंत्री व विरोधी पक्ष आणि महाविकास आघाडी सरकारने मराठा समाजाच्या आरक्षण प्रश्नावर व वरील मागण्यांवर घटनात्मक पर्याय निवडला नाही तर मात्र संभाजी ब्रिगेड तीव्र व आक्रमक आंदोलनाच्या तयारीत आहे. असा इशाराही दिला.
26 जून या दिवशी कोल्हापूर येथे शाहू महाराज यांचे दर्शन घेऊन त्या ठिकाणी परिषद घेणार आहोत जर मागण्या पूर्ण झाल्या नाहीत तर 27 जून पासून महाराष्ट्रात आंदोलन केले जाणार असे मनोज आखरे यांनी सांगितले. या आक्रमक आंदोलनामध्ये आमदार खासदार मंत्री यांना झळ पोहचली तर यांस सर्वस्वी हेच मंत्री, आमदार, खासदार जबाबदार राहतील, असे आखरे यांनी सांगितले.
या पत्रकार परिषदेला संभाजी ब्रिगेडचे प्रदेश उपाध्यक्ष अण्णासाहेब सावंत, प्रदेश उपाध्यक्ष सुहास राणे, मुंबई प्रदेश अध्यक्ष दिनेश महाडिक, केंद्रीय कार्यकारणी सदस्य शशिकांत कन्हेरे, डॉ.आर. पाटील, राजेंद्र कांबळे, श्रीकांत गिरी, सुनिल कारावळे, जनानि शिगवले, बाबा सावंत आदी मान्यवर उपस्थित होते.