
वकिलांना मुंबई लोकल ने प्रवासाची मुभा द्या !!
मुंबई लोकल रेल्वेने वकिलांना लोकल प्रवास करण्याची मुभा देण्यात यावी, अशी मागणी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे एड. सुमेध गायसमुद्रे यांनी केली आहे. मुंबईची लाईफलाईन असलेल्या मुंबई लोकल रेल्वेमध्ये करोना कार्यकाळात वकिलांना रेल्वे प्रवासावर बंदी घालण्यात आलेली आहे यामुळे वकिलांमध्ये संतापाची लाट निर्माण झालेली आहे, करोनाची दुसरी लाट आल्यानंतर रेल्वेमध्ये सर्व शासकीय कर्मचारी व अत्यावश्यक सेवेतील सर्वांना मात्र प्रवास दिला जात आहे, वकिलांना मुंबईत न्यायालयात तथा इतर न्यायालयीन कामकाजासाठी प्रवास करणे जिकिरीचे होत असल्याने सदर बाब खर्चिक होत आहे त्यामुळे वकिलांच्या रेल्वे प्रवासाकरीता येत्या एक जून पासून त्वरित त्यांना प्रवासाची परवानगी देण्यात यावी.
न्यायालयाच्या कामकाजासाठी वेळे अभावी व वेळेच्या मर्यादेने अनेक वकिलांवर व त्यांच्या कुटुंबीयांवर उपासमारीची वेळ आलेली आहे, ज्युनिअर वकिलांवर तर भावी गोष्टींबद्दल व करिअर बद्दल प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे, तरी पुढील लोक डाऊन सेवा चालू असतानाच या नियमावलीत वकिलांना रेल्वेमध्ये प्रवास करण्याची मुभा देण्यात यावी, अशा मागणीचे निवेदन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे सुमेध गायसमुद्रे यांनी केले आहे.