
वादळग्रस्तांना नुकसान भरपाई जाहीर करा !!
दि. १६ मे रोजी चक्री वादळामुळे कोकण किनारपट्टीचे सुमारे ७२० कि.मी.चे मोठे नुकसान झाले. किनारपट्टी वरील सिंधुदुर्ग, रत्नागिरी, रायगड, जिल्ह्यातील अनेक घरे, गुरांचे गोठे, माड, पोफळी, हापूस कलमे, काजू बागायती आदींचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.
पुढील महिन्यात पावसाळा सुरू होईल, त्यापूर्वी वादळग्रस्तांना शासकीय पातळीवर पंचनामे करून नुकसान भरपाई मदत जाहीर करावी.