
मुंबई प्रभाग क्रमांक २१० ब्राह्मणवाडी येथील पदपथावर असलेल्या स्ट्रीटलाईटवरील ५० वॅट क्षमतेच्या दिव्यांच्या ऐवजी १०५ वॅटच्या दिव्यांची सोय !
मुंबई प्रभाग क्रमांक २१० ब्राह्मणवाडी येथील पदपथावर असलेल्या स्ट्रीटलाईटवरील ५० वॅट क्षमतेच्या दिव्यांच्या ऐवजी १०५ वॅटच्या दिव्यांची सोय !
दक्षिण मुंबईचे खासदार श्री. अरविंद सावंत, शिवसेना उपनेते, स्थायी समिती अध्यक्ष श्री. यशवंत जाधव, भायखळा विधानसभा मतदारसंघाच्या आमदार सौ. यामिनी यशवंत जाधव यांच्या सूचनेनुसार तसेच शिवसेना मा. नगरसेवक श्री. मनोज पांडुरंग जामसुतकर यांच्या प्रयत्नाने ब्राह्मणवाडी येथील पदपथावर असलेल्या स्ट्रीटलाईटवरील ५० वॅट क्षमतेच्या दिव्यांच्या ऐवजी १०५ वॅटच्या दिव्यांची सोय उपलब्ध करून दिली त्याबद्दल स्थानिक रहिवाश्यांच्या प्रमुख उपस्थिती मध्ये प्रभाग क्रमांक २१० च्या नगरसेविका सौ. सोनम मनोज जामसुतकर यांच्या हस्ते उदघाटनाचा कार्यक्रम पार पडला. तदप्रसंगी शिवसेना मा. नगरसेवक श्री. मनोज पांडुरंग जामसुतकर, मा.नगरसेवक श्री. सुर्यकांत पाटील, शाखाप्रमुख श्री. हेमंत मयेकर, जेष्ठ कार्यकर्ते श्री. राजेश सिंग, श्री. कल्पेश गायकवाड, स्वाती कोळेकर व अन्य विभागीय कार्यकर्ते तसेच विभागातील नागरिक उपस्थित होते.