
नगरसेविका सोनम जामसुतकर यांच्याकडून प्रभाग क्रमांक २१० लव्हलेन बीआयटी चाळ परिसर सुरू असलेल्या विकासकामांची पाहणी !
नगरसेविका सोनम जामसुतकर यांच्याकडून प्रभाग क्रमांक २१० लव्हलेन बीआयटी चाळ परिसर सुरू असलेल्या विकासकामांची पाहणी !
प्रभाग क्रमांक २१० च्या स्थानिक नगरसेविका सौ. सोनम मनोज जामसुतकर व शिवसेना मा. नगरसेवक श्री. मनोज पांडुरंग जामसुतकर यांनी लव्हलेन बीआयटी चाळ परिसर या ठिकाणी सुरू असलेल्या विकासकामांची पाहणी केली व नागरिकांसोबत संवाद साधला. तदप्रसंगी नागरिकांनी कामाबाबतच्या दिलेल्या काही महत्त्वाच्या सुचना व तक्रारी या निश्चितपणे सोडविण्याचे त्यांनी आश्वासन दिले. या परिसरामध्ये नगरसेविका सौ. सोनम मनोज जामसुतकर यांच्या नगरसेवक निधीतून विविध ठिकाणी सुरू असलेल्या विकास कामांचा आढावा घेण्यासाठी ही पाहणी भेट ठेवण्यात आली होती. तदप्रसंगी महापालिकेचे अभियंते तसेच स्थानिक रहिवाश्यांचे प्रमुख प्रतिनिधी व विभागातील जेष्ठ कार्यकर्ते श्री.राजेश सिंग, श्री. कल्पेश गायकवाड, श्री. प्रकाश साळवे, श्री. शिरीष चिखलकर, श्री. सुनील देठे, श्री. नितीन मोहिते व श्री. सावंत आदी उपस्थित होते.