
माथाडी कामगारांना लोकल प्रवासाची मुभा मिळावी - शंकर जोरे !
माथाडी कामगारांना लोकल प्रवासाची मुभा मिळावी - शंकर जोरे !
शिवसेना प्रणित हिंदुस्तान माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार सेनेच्या वतीने सन्माननीय मुख्यमंत्री श्री. उद्धवजी ठाकरे यांना माथाडी कामगारांना लोकल रेल्वे प्रवासास परवानगी मिळावी म्हणून निवेदन देण्यात आले.
कोविडच्या दुसऱ्या लाटेला थोपवण्यासाठी शासनाच्या 'ब्रेक द चेन' अंतर्गत फक्त शासकीय (केंद्र/ राज्य/ स्थानिक) कर्मचारी व सर्व प्रकारचे आरोग्य कर्मचारी यांनाच परवानगी देण्यात आली आहे.
माथाडी कामगार हे अत्यावश्यक व जीवनावश्यक मालाची चढ उतार करून वितरणाची महत्वाची जबाबदारी पार पाडत असून त्यांची सेवा अत्यावश्यक सेवा समजून त्यांना लोकल रेल्वे प्रवासास मुभा द्यावी अशी विनंती मा. मुख्यमंत्र्यांना करण्यात आली.
सदर निवेदनाची प्रत खासदार व भारतीय कामगार सेनेचे अध्यक्ष श्री. अरविंद सावंत यांनाही अध्यक्ष श्री. विकास मयेकर व कार्याध्यक्ष श्री. शंकर झोरे यांच्या हस्ते पाठपुराव्यासाठी देण्यात आली.